Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर पालघर बोईसर MIDC मधील जखारिया कंपनीत भीषण स्फोट, एका कामगाराचा मृत्य, ४ गंभीर...

बोईसर MIDC मधील जखारिया कंपनीत भीषण स्फोट, एका कामगाराचा मृत्य, ४ गंभीर जखमी

Related Story

- Advertisement -

बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील जखारिया कंपनीत भीषण स्फोट झाल्याची दुर्घटना घडली आहे. स्फोटानंतर लागलेल्या आगीत होरपळून एका कामगाराचा मृत्यू झाला तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत.

हा स्फोट इतका भीषण होता की तीन ते चार किलोमीटर परिसरात स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आला. आगीच्या दुर्घटनेत होरपळलेल्या कामगारांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले आहे. मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

- Advertisement -

पालघरच्या बोईसर येथील जखरिया कंपनीत हा स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर आता अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनस्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.


- Advertisement -

 

- Advertisement -