Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर पालघर चार सहाय्यक आयुक्तांची नव्याने नियुक्ती

चार सहाय्यक आयुक्तांची नव्याने नियुक्ती

Subscribe

तसेच पोलीस आयुक्तालयामधील पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे व महेश तरडे यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती देण्यात आली आहे.

भाईंदर :- मीरा- भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालयामध्ये चार नवीन सहायक आयुक्तांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. विजयकुमार मराठे( उपविभागीय अधिकारी सिल्लोड विभाग, छत्रपती संभाजीनगर), उमेश शंकर माने (सहाय्यक पोलिस आयुक्त ठाणे शहर), दिपाली मोहन खन्ना (सहायक पोलीस आयुक्त, नाशिक शहर), बजरंग हिंदुराव देसाई (सहायक पोलीस आयुक्त पुणे शहर) येथे कार्यरत असलेल्या या पोलीस अधिकार्‍यांच्या मीरा-भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालयामध्ये सहायक पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तसेच पोलीस आयुक्तालयामधील पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे व महेश तरडे यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती देण्यात आली आहे.

तर भाईंदर विभागाच्या परिमंडळ एकमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले शशिकांत भोसले यांची बृन्हमुंबईमध्ये बदली करण्यात आली आहे. राज्यामध्ये गृह खात्याकडून अनेक पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मीरा- भाईंदरमधील सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस अधिकार्‍यांची बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -