घरपालघरफसवणूक करणार्‍या टोळीचा म्होरक्या जेरबंद

फसवणूक करणार्‍या टोळीचा म्होरक्या जेरबंद

Subscribe

स्वप्निल हळदणकर, अमोल भोईर, राहुल सिंग उर्फ सुरज दुबे आणि अरविंद दुबे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वसईः स्वस्तात फ्लॅट देतो, अशी बतावणी करून गंडा घालणार्‍या टोळीतील म्होरक्याला मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अटक केली आहे. रामसिंग देवरा (२८) असे म्होरक्याचे नाव आहे. त्याच्या अटकेनंतर फसवणुकीच्या सात गुन्ह्यांची उकल झाली आहे. फिर्यादी संतोष ठाकुर यांना विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटीतील सनसाईटस इमारतीमधील स्वप्नील हळदणकर यांचा फ्लॅट विकत देतो, अशी बतावणी करून ७ लाख ८३ हजार ५०० रुपये घेऊन गंडा घातला होता. पैसे घेतल्यानंतर सदरचा फ्लॅट स्वप्निल हळदणकर यांच्या मालकीचा नसल्याची माहिती ठाकुर यांना मिळाली. त्यांनी पैसे परत मागितले असता तेही दिले नाहीत. त्यामुळे ठाकुर यांच्या तक्रारीवरून अर्नाळा पोलीस ठाण्यात रामसिंग देवरा उर्फ राम पाटील, स्वप्निल हळदणकर, अमोल भोईर, राहुल सिंग उर्फ सुरज दुबे आणि अरविंद दुबे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशाप्रकारे वसई विरार परिसरात स्वस्त दरात फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात देऊन फसवणुक करणारी टोळी सक्रीय झाली होती. त्यामुळे यागुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा तीनचे पथक करत होते. यापथकाने याटोळीचा म्होरक्या रामसिंग देवरा यांला अटक केली. त्यानंतर याटोळीने वसई विरार परिसरात केलेल्या गुन्ह्यांची उकल केली. याटोळीविरोधात अर्नाळा पोलीस ठाण्यात चार, नालासोपारा पोलीस ठाण्यात दोन, तुळींज पोलीस ठाण्यात एक मिळून सात गुन्हे दाखल असल्याचे उजेडात आले. याटोळीने दोन कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घातला असून पोलीस त्याच्या साथिदाराचा शोध घेत आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, हवालदार अशोक पाटील, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, सुनील पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -