Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर पालघर सराफाने लावला कोट्यवधीं रुपयांचा चुना

सराफाने लावला कोट्यवधीं रुपयांचा चुना

Subscribe

लग्न ऐन तोंडावर आले असताना सोन्याचे दागिने बनविण्यासाठी आयुष्यभराची पुंजी खर्ची घालणार्‍यांच्या पोटात या फसवणुकीमुळे मात्र अक्षरक्ष: गोळा आला आहे.

बोईसर, लग्नसराईसाठी मोठ्या विश्वासाने दागिने बनविण्यास दिलेल्या सराफाने अनेक ग्राहकांना गंडा घातल्याचा प्रकार बोईसरमध्ये उघडकीस आला आहे.याप्रकरणी फसवणूक करणार्‍या सराफाविरोधात बोईसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातील लग्न ऐन तोंडावर आले असताना सोन्याचे दागिने बनविण्यासाठी आयुष्यभराची पुंजी खर्ची घालणार्‍यांच्या पोटात या फसवणुकीमुळे मात्र अक्षरक्ष: गोळा आला आहे.

बोईसर शहरातील एसटीबस स्टँडजवळील पिंकल ज्वेलर्सचा मालक ललित सोनी हा आपले दुकान बंद करून ८ मार्च रोजी कुटुंबासहीत अचानक गायब झाला होता.दुकान आणि घराला दोन-तीन दिवस टाळे लावून ज्वेलर्स अचानक गायब झाल्याने लग्नसराईत दागिने बनविण्यासाठी आगाऊ पैसे जमा केलेले अनेक ग्राहक यामुळे हवालदिल झाले होते.
या प्रकरणी वर्षा वसंत पाटील,सुभाष वामन गवळी,कल्पेश विलास गवळी,वनश्री विकास घरत आणि संगम सेवक सासे या फसवणूक झालेल्या ग्राहकांनी बोईसर पोnrस स्टेशन येथे धाव घेऊन ललित सोनी या ज्वेलर्सविरोधात तक्रार दिली होती.तक्रारीच्या आधारे बोईसर पोलिसांनी ज्वेलर्सशी संपर्क साधून पोलीस स्टेशनला बोलावून त्याचा जबाब नोंदवला होता.यामध्ये ग्राहकांकडून घेतलेले सोन्याचे दागिने आणि आगाऊ पैसे घेऊन फसवणूक केल्याचे मान्य करीत ज्वेलर्सने लवकरात लवकर सर्व दागिने किंवा पैसे परत करण्याचे कबूल केले होते.मात्र याला दोन महिने होऊन सुद्धा तसेच वारंवार आश्वासन देऊन ही पिंकल ज्वेलर्सचा मालक ललित सोनी याने दागिने किंवा पैसे परत करण्यास असमर्थता दाखविल्याने अखेर त्याच्याविरोधात बोईसर पोलीस स्टेशन येथे कलम ४२० आणि ४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -