घरपालघरपालघर जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात ‘मोफत मॉल’

पालघर जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात ‘मोफत मॉल’

Subscribe

मोफत मॉल या उपक्रमांतर्गत दुकानरूपी मंडप टाकून त्यातून गरजूंना हवे ते मोफत घेऊन जाण्याची ही संकल्पना आहे.

दुर्गम भागातील गरजूसाठी एक स्तुत्य उपक्रम गिर्यारोहकांच्या व निसर्ग भटकंती करणाऱ्या एका समूहाने (अॅ्डव्हेंचर्स लव्हर्स ग्रुप) हाती घेतला आहे. ‘मोफत मॉल’ संकल्पनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात वापरण्यायोग्य कपड्यांसह लहान मुलांची खेळणी, पादत्राणे, भांडी, शालोपयोगी साहित्य, घरातील काही वस्तू आदी मोफत वाटप करण्याचा कार्यक्रम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मोफत मॉल या उपक्रमांतर्गत दुकानरूपी मंडप टाकून त्यातून गरजूंना हवे ते मोफत घेऊन जाण्याची ही संकल्पना आहे. ३० जणांचा समूह या उपक्रमांतर्गत काम करत आहे. मोकळ्या मैदानावर हजार चौरस फुटात हा मॉल उभारला जातो. या मॉलमध्ये कूपन प्रणालीद्वारे गरजूंना १० वस्तू मोफत घेण्याची मुभा देण्यात येते. मॉलमध्ये महिला, पुरुष, वृद्ध आणि मुलांसाठीच्या कपड्यांपासून ते पादत्राणे ते अगदी खेळणी आणि इमिटेशन ज्वेलरी आदी वस्तू ठेवण्यात येतात. वेगळवेगळ्या दुर्गम भागात एका दिवसापूरताच हा मॉल असतो.

पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागांत भटकंती व गिर्यारोहण करताना तेथील हलाखीत जगणाऱ्या कुटुंबाची स्थिती लक्षात घेत त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला पाहिजे, अशी सामाजिक भावना निर्माण झाल्यानंतर या समूहाने या संकल्पनेतून आपले उद्दिष्ट साध्य करायला सुरुवात केली. हाच उद्दिष्ट बाळगून दुर्वेस गावात ‘मोफत मॉल’चे आयोजन करण्यात आले होते. दुर्वेस गावात कातकरी पाडा येथील मैदानावर नुकताच सुमारे ९०० चौरस फूट आकाराचा एक तंबू म्हणजे मॉल उभारला गेला. जवळपास दीड हजार आदिवासी वस्त्यांमधील ग्रामस्थांनी शिबिराला भेट दिली. कूपन प्रणालीद्वारे येथे भेट देणाऱ्या प्रत्येक गरजूला आवश्यक असलेल्या १० वस्तू मोफत देण्यात आल्या. वस्तू मिळताच गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असताना दिसत होता. एका वृद्ध महिलेने तर आवडते कपडे उचलले असता तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून या उपक्रमाचे फलित झाल्याचे समाधान समूह सदस्यांनी व्यक्त केले. विशाल गायकर यांनी गर्दीचे व्यवस्थापन केले होते. ग्रामपंचायतीच्या परवानगीने हा मॉल एक दिवसासाठी लावला होता. त्यातून नागरिकांना मिळालेली मदत पाहून या समूहाचे कौतुकही करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा –

सोमय्यांनी माफी मागावी, अन्यथा १०० कोटी द्यावे – अनिल परब

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -