घरपालघरजि.प. शाळेतील शिक्षकाच्या बदलीने सारा गाव भावूक; पालक-विद्यार्थ्यांकडून भावनिक निरोप

जि.प. शाळेतील शिक्षकाच्या बदलीने सारा गाव भावूक; पालक-विद्यार्थ्यांकडून भावनिक निरोप

Subscribe

बोईसर (पालघर) : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाच्या बदलीने सारा गाव भावून झाल्याचे पालघरच्या विक्रमगड तालुक्यात पाहायला मिळाले. शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रणालीद्वारे अजित गोणते (ajit gonte) सरांची बदली झाली आणि ग्रामस्थांना भावुक होऊन त्यांना निरोप द्यावा लागला. (Ajit Gone Sir from Vikramgad Taluk of Palghar)

जिल्हा परिषद शिक्षक म्हटला की, १० ते ५ अशी कामाची वेळ पाळणारे शिक्षक दिसतात, पण पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील वेहेलपाडा गावातील कासपाड्यातील अजित गोणते सर हे त्याहून अगदी वेगळे होते. गेली १४ वर्षे त्यांनी विद्यार्थी सर्वांगीण विकास व गुणवत्ता, क्रीडास्पर्धा व वकृत्व स्पर्धेतील तालुका, जिल्हा पातळीवरील विद्यार्थ्यांचे यश, शाळेच्या भौतिक सुविधा, सांस्कृतिक कार्यक्रम, सहल असे विविध उपक्रम राबवून प्रत्येक पालक व ग्रामस्थांच्या मनात घर केले होते. परंतु शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रणालीद्वारे अजित सरांची जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा अशी दोन्ही ठिकाणी बदली झाल्यामुळे गावातील ग्रामस्थांना भावुक होऊन सरांना निरोप द्यावा लागला.

- Advertisement -

“आमचे आदर्श शिक्षक आमचा अभिमान” असे पोस्टर लावून गावातील माता-भगिनी आरती ओवळत, रस्त्याच्या दुतर्फा विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांनी पुष्पवृष्टी करत, पारंपरिक “तारपा” वाद्याच्या गजरात कासपाड्यातून सरांची मिरवणूक काढली. मिरवणुकीत सर्व पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ भावुक होऊन सरांसोबत सरांसाठी सर्वजण रडत होते.

- Advertisement -

अनेकांना आयुष्यभर नोकरी करून सेवापूर्तीच्या शेवटच्या दिवशीसुद्धा असे प्रेम मिळत नाही, ते अजित गोणते सरांनी १४ वर्षात त्याच्या वयाच्या ऐन पस्तीशीत मिळविले. लहानापासून पुण्यात शिकल्यामुळे ग्रामीण भागाशी त्यांचा काडीचाही संबंध नव्हता, पण आदिवासी ग्रामीण भागात शिक्षक म्हणून ते नोकरीला लागले. कासपाड्यातील ग्रामीण विद्यार्थी, गाव, गावातील ग्रामस्थांना पाहिल्यावर त्यांनी ठरवले की, माझी खरी गरज इथे आहे.

पुढे त्यांनी कासपाड्यातील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना कुटुंब मानून गावासाठी खूप काही केले. अनेक उपक्रम राबवून त्यांनी गावातील लोकांची मने जिंकली. या अजित गोणते सरांच्या प्रेमापोटी, आपल्याच कुटुंबातील एक व्यक्ती आपल्यातून सोडून चालली आहे, जशी एखादी मुलगी लग्न होऊन सासरला जाते आणि तिला आपण आवंढा गिळत, कधी रडत-रडत निरोप देतो, तसा सन्मानपूर्वक निरोप कासपाड्यातील ग्रामस्थांनी अजित गोणते सरांना दिल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -