Eco friendly bappa Competition
घर पालघर विरारमध्ये गदिमा मराठी साहित्य संमेलन संपन्न

विरारमध्ये गदिमा मराठी साहित्य संमेलन संपन्न

Subscribe

स्वागताध्यक्ष डॉ. अ. ना. रसनकुटे यांनी ग. दि. माडगूळकरांची कारकीर्द कशी घडली याबद्दल प्रतिपादन केले.

वसईः अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद अंतर्गत कोकण प्रदेशच्यावतीने विरारमधील विद्याविहार इंग्लिश हायस्कूलमध्ये गदिमा राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. भूपेंद्र संखे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. सुधीर दांडेकर प्रमुख पाहुणे होते. डॉ. मंगला परब यांच्या हस्ते उद्घाटन झाले. डॉ. अ. ना. रसनकुटे स्वागताध्यक्ष होते.
सुधीर दांडेकर यांनी श्रेष्ठ साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांचा जीवनपट उलगडून सांगितला. तसेच वाचन संस्कृती टिकवण्याचे महत्त्व पटवून दिले. स्वागताध्यक्ष डॉ. अ. ना. रसनकुटे यांनी ग. दि. माडगूळकरांची कारकीर्द कशी घडली याबद्दल प्रतिपादन केले.

परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, उपाध्यक्षा शुभांगी काळभोर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष शुभम पाटील आणि उपाध्यक्षा मंजुषा गवई यांनी कवितांचे संकलन केले. कोकण उपाध्यक्षा डॉ. अलका नाईक यांनी कविता सादर करणार्‍या कवींना मार्गदर्शन करून गदिमांचे गीत गाऊन दाखवले. कोकण कार्याध्यक्ष संदीप तोडकर यांनी रसिकांना गदिमांविषयी माहिती दिली. भूपेंद्र संखे यांच्या ’शब्दवेल’ या काव्यसंग्रहाचे डॉ. अ. ना. रसनकुटे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. शुभम् पाटील, अ‍ॅड. नयन जैन, मंजुषा गवई, डॉ. नेहा संखे, मोहन राऊत, राजेश बक्षी, अ‍ॅड. अर्चना जैन, मधुकर तराळे, उर्मिला घरत, सविता आव्हाड, यांनी साहित्य संमेलन यशस्वीरित्या आयोजित केले. श्रीलंका येथे मे २०२३ मध्ये संपन्न होणार्‍या आगामी आंतरराष्ट्रीय काव्य संमेलनाची घोषणा यावेळी करण्यात आली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -