घर पालघर गणेश मंडळांनी सीसीटीव्ही लावावेत

गणेश मंडळांनी सीसीटीव्ही लावावेत

Subscribe

धार्मिक तेढ निर्माण होईल असे कोणतेही वक्तव्य, कार्यक्रम, कृत्य, देखावे, प्रतिमा व आक्षेपार्ह बॅनर न लावण्याबाबत तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्तींचे तंतोतंत पालन करण्याबाबत सविस्तर माहिती बैठकीत देण्यात आली आहे.

भाईंदर :- नवघर पोलिसांनी आगामी गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या बैठकीत
गणपती उत्सव साजरा करताना महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व कार्यक्रमांच्या ठिकाणी गर्दी मधील जनसमुदायाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याकरता मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत असा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला जवळपास ७० ते ८० मंडळे उपस्थित होती. नवघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगलमूर्ती हॉल, गोडदेव नाका या ठिकाणी आगामी गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत उपस्थित मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना शासनाच्या नियमाप्रमाणे गणपती उत्सव साजरा करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. मंडप बांधताना वाहतुकी संदर्भात काय दक्षता घेतली पाहिजे, ध्वनीक्षेपकाचे नियमांबाबत, डिजेचा वापर न करण्याबाबत, कार्यक्रम ठिकाणी जास्तीत जास्त स्वयंसेवक नेमण्यात यावेत याबाबत सांगण्यात आले आहे.धार्मिक तेढ निर्माण होईल असे कोणतेही वक्तव्य, कार्यक्रम, कृत्य, देखावे, प्रतिमा व आक्षेपार्ह बॅनर न लावण्याबाबत तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्तींचे तंतोतंत पालन करण्याबाबत सविस्तर माहिती बैठकीत देण्यात आली आहे.

मंडळांच्या अडीअडचणी समजून घेत त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले आहे. वाढती सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी घ्यावयाच्या दक्षता व अंमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. सदर बैठक नवघर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त उमेश माने, पोलीस निरीक्षक संजय केदारे, नवघर पोलीस ठाणे आणि पोलीस निरीक्षक सुशिलकुमार शिंदे (गुन्हे) नवघर पोलीस ठाणे यांच्या उपस्थितीत पार पडली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -