घर पालघर गोरक्षणाच्या नावाने टोळक्याची गुंडगिरी

गोरक्षणाच्या नावाने टोळक्याची गुंडगिरी

Subscribe

त्यावेळी या टोळक्याने पाठीमागून दगडफेक करायला सुरुवात केली आणि गाडी ओव्हरटेक करून अडवण्याचा प्रयत्न केला. शेवटी विशालने त्याची गाडी मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील चिल्लार फाटा येथील एका हॉटेलमध्ये थांबवली.

वसईः मंगळवारी पहाटेच्या सुमारास कथित बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून स्थानिक तरुणाचा पाठलाग करून त्याला मारहाण करण्यात आली आहे. शिवाय त्याच्या गाडीची देखील तोडफोड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशाल पवार असे या पीडित तरुणाचे नाव असून तो मनोरजवळील हालोली पाटीलपाडा येथील रहिवाशी आहे.विशाल हा मंगळवारी पहाटे त्याच्या ड्रायव्हरला आणण्यासाठी बोलेरो गाडी घेऊन बोईसर येथे गेला होता. बोईसर येथून परत येताना त्याला नागझरी नाका येथे 12-15 जणांचे टोळके उभे असलेले दिसले. विशालने नागझरी नका ओलांडल्यावर या टोळक्याने दोन कार घेऊन विशालचा पाठलाग सुरू केला आणि सूनसान रस्त्यात गाडी थांबवण्यासाठी विशालला शिवीगाळ आणि दमदाटी करू लागले. परंतु विशाल घाबरल्याने त्याने गाडीचा वेग वाढवला. त्यावेळी या टोळक्याने पाठीमागून दगडफेक करायला सुरुवात केली आणि गाडी ओव्हरटेक करून अडवण्याचा प्रयत्न केला. शेवटी विशालने त्याची गाडी मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील चिल्लार फाटा येथील एका हॉटेलमध्ये थांबवली.

त्यावेळी या टोळक्याने विशालच्या थांबलेल्या गाडीला दोनवेळा मागून जोरदार धडक दिली आणि त्याच्या गाडीच्या काचा फोडून जबरदस्तीने गाडीतून खेचले आणि मारहाण केली. विशालने यावेळी मी स्थानिक असल्याचे सांगून देखील या कथित बजरंग दलाच्या गोरक्षकांनी विशालला मारहाण केली आणि त्याच्या गाडीचे देखील नुकसान केले शिवाय निमूदपणे जा नाहीतर आणखी फटके देऊ, अशी दमदाटीही केली. याप्रकरणी विशालने मनोर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. मात्र पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून एकप्रकारे गुन्हेगारांना मोकळीकच दिल्याचा आरोप होत होता. सदर प्रकरण जेव्हा मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिवलकर यांच्या निदर्शनास येताच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित अज्ञात आरोपींना विरोधात विविध कलामा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण असून गोरक्षणाच्या नावाखाली गुंडगिरी करणार्‍या या कथित बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -