Eco friendly bappa Competition
घर पालघर गंजाड बस थांबा गेलं अतिक्रमणांच्या आड

गंजाड बस थांबा गेलं अतिक्रमणांच्या आड

Subscribe

काही वर्षांपूर्वी या बस स्थानकाच्या कामाचे बांधकाम करायचे असे सांगून एखाद्या फंडातून एक काम करून घेऊ असे एका पदाधिकार्‍याने सांगूनही बसथांबा होऊ शकलेला नाही.

डहाणूः डहाणू-नाशिक राज्य मार्गावर गंजाड येथे पूर्वी प्रवाशांसाठी बस थांबा होता. पण, हा बसथांबा अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला असून त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत आहेत. गंजाडहून डहाणूकडे किंवा नाशिककडे जाण्यासाठी अनेक शाळकरी मुले, अबालवृध्द प्रवासी असतात. गेल्या अनेक वर्षांपासून पूर्वी तेथे असलेला बस थांबा अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला आहे. जुन्या पडीक झालेल्या बस थांब्याच्या जागी नवीन उभारावा अशी नागरिकांची मागणी आहे. काही वर्षांपूर्वी या बस स्थानकाच्या कामाचे बांधकाम करायचे असे सांगून एखाद्या फंडातून एक काम करून घेऊ असे एका पदाधिकार्‍याने सांगूनही बसथांबा होऊ शकलेला नाही.

याबाबत ग्रामपंचायत गंजाड सरपंच अभिजित देसक व तेथील ग्रामसेवक किरण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की, बस थांबा अतिक्रमण झाल्यासंबंधी लवकरच नोटीस काढून अतिक्रमण दूर केले जाईल. बस थांब्याचे नूतनीकरण करण्यात यावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी संपर्क साधला जाईल. येथे प्रवाशासाठी छोटे शौचालय बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जागा उपलब्ध करून केली जाईल. जेणेकरून ग्रामपंचायतीमार्फत तेथे प्रवाश्यांसाठी शौचालय आणि बस थांबा शेड उभारून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर केली जाईल.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -