घरपालघरटाकाऊ वस्तूपासून गार्डन; सोसायटीतील मुलांचा उपक्रम

टाकाऊ वस्तूपासून गार्डन; सोसायटीतील मुलांचा उपक्रम

Subscribe

कोरोनामुळे शाळा, कॉलेज बंद असल्याने मुले घरातच बसून कंटाळली आहेत. त्यांना कामात गुंतवावे आणि त्यातून काही तरी चांगले निर्माण करावे या उद्देशाने घरातील लोक मुलांना कशात ना कशात बिझी ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

कोरोनामुळे शाळा, कॉलेज बंद असल्याने मुले घरातच बसून कंटाळली आहेत. त्यांना कामात गुंतवावे आणि त्यातून काही तरी चांगले निर्माण करावे या उद्देशाने घरातील लोक मुलांना कशात ना कशात बिझी ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. असाच प्रयत्न विरार पूर्व जीवदानी रोडवरील हिल पार्क सोसायटीने केला असून त्यांनी सोसायटीमधील मुलांना टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ बनवण्यास प्रोत्साहन दिले आणि त्यातून उभे राहिले ते एक सुंदर गार्डन.

कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे महत्व आपल्याला खऱ्या अर्थाने पटले म्हणूनच मुलांना आतापासूनच वृक्षांचे महत्व पटावे. त्यांची निगा राहावी हे पटवून देण्यासाठी आम्ही मुलांना टाकाऊ वस्तूंमधून गार्डन तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते आणि मुलांनी अप्रतिम असे गार्डन तयार केले आहे. आता आम्ही सोसायटीच्या आवारात औषधी वनस्पती लावल्या आहेत. त्यात अजून भर घालणार आहोत ज्यातून मुलांच्या ज्ञानातही भर पडेल.
– सुहास शिर्के, सोसायटी सचिव

- Advertisement -

दहिसर पोस्ट ऑफिस जवळच्या भिंतीवर मस्त असे गार्डन तयार केले आहे त्याची संकल्पना घेऊन हिल पार्क सोसायटीमधील, बच्चे कंपनीने लॉकडाऊनमध्ये टाकाऊपासून टिकाऊ, बाटल्या वापरून रंगबेरंगी गार्डन तयार केले आहे. या त्यांच्या गार्डनमध्ये ९ प्रकारच्या सदाफुली लावण्यात आल्या आहेत. तर सुकलेले आवळ्याचे झाड न तोडता त्यावर मुलांनी मोगरा, गुळवेल आणि गोकर्ण सोडल्याने त्या सुकलेल्या वृक्षाचा त्यांनी कल्पकतेने वापर केल्याचे दिसत आहे. सद्या एका भिंतीवर तयार केलेल्या गार्डननंतर आता दुसऱ्या भिंतीवरही गार्डन उभारण्यात येणार आहे. हे गार्डन बनवण्यासाठी स्पंदिता शिर्के, सोनाली गावडे, देवयानी चव्हाण, सिद्धी कोंडलकर, पालवी हरियाण, ऋषिकेश दळवी यांनी पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा –

नुकसानग्रस्तांच्या व्यथा केंद्रापुढे मांडणार; केंद्रीय पथक प्रमुखांची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -