वसईः विरारमध्ये पार पडलेल्या मंगळागौर स्पर्धेत गौरी सखी ग्रुपने पहिला क्रमांक पटकावून बाजी मारली. नवी मुंबईतील ऐरोली येथील रुचिरा ग्रुपने दुसरा तर पनवेलच्या सखी ग्रुप, स्वामिनी ग्रुपने तृतीय क्रमांक पटकावला. स्वरा ग्रुप, दादरच्या स्वामिनी ग्रुपला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. वरळीच्या मैत्री ग्रुप आणि बोळेश्वर महिला मंडळाला विशेष पारितोषिक देण्यात आले. यंग स्टार ट्रस्टचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर, समन्वयक अजीव पाटील यांच्या संकल्पेनेतून गेली कित्येक वर्षे विरारमध्ये दरवर्षी श्रावणात भव्य मंगळागौर स्पर्धा आयोजित केली जाते. यात वसई- विरारसह पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातील महिला ग्रुप सहभागी होत असतात. यंदा तर शनिवार आणि रविवार दिवसभर स्पर्धा रंगली होती. मुंबई, डोंबिवली,नवी मुंबई, ठाणे,पालघर येथील ८१ संघांनी सहभाग घेऊन उपस्थित परिक्षक ,प्रेक्षक यांचे आनंदाचे डोही आनंद तरंग’ या संतांच्या वचनानुसार सुंदर अभिनय,सुंदर आवाज,प्रसन्न खेळांनी सर्वांची मने जिंकून घेतली.
या स्पर्धेत १७ वर्षांच्या तरुणीपासून ते ७० वर्षांच्या आजीबाईंनी सहभाग घेतला होता. प्रसन्नतेने भारeवललेल्या या कार्यक्रमात आमदार क्षितीज ठाकूर,युवानेते सिद्धार्थ ठाकूर, प्रथम महिला महापौर प्रविणा ठाकूर, उमेश नाईक,पंकज ठाकूर, विलासबंधू चोरघे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. विद्या वाचस्पती,दलित कादंबरी चिकित्सक नंदा मेश्राम व चंद्रकांत वणे यांनी परिक्षक म्हणून काम केले. अजीव पाटील,उमेश नाईक,पंकज ठाकूर, विलास चोरघे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मिलिंद पोंक्षे,मुग्धा लेले, भूषण चुरी,तानाजी पाटील,बक्षी,मयेकर यांनी सहकार्य केले.