घरपालघरघरकुल लाभार्थी मेटाकुटीला

घरकुल लाभार्थी मेटाकुटीला

Subscribe

तर सिमेंट विटांचे दर सहा हजार रुपयांवर आहेत. त्यामुळे घर बांधणे अडचणीचे आहे. तर अद्यापही रेती डेपो सुरु झाले नाहीत. त्यामुळे तालुक्यात ट्रॅक्टर चालक वारेमाप लुटत आहेत. ग्रामीण भागात नदीतील रेतीचे 8 ते 10 हजार रुपये दर आकारत आहेत.

जव्हार: जव्हार तालुक्यात शासनाच्या विविध योजनांद्वारे घरकुल लाभार्थी निवडून त्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून एक लाख वीस हजार रुपये देण्यात येत आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या अनुदानात वाढ तर झालेली नाही. परंतु बांधकाम साहित्य दर वाढीने कळस गाठला आहे. या सगळ्यांत सिमेंट महत्त्वाचे असताना,सिमेंटच्या15 टक्क्यांनी वाढल्याने लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करताना असंख्य अडचणी उद्भवत आहेत.त्यामुळे येथील आदिवासी लाभार्थी घरकुल बांधताना अगदी मेटाकुटीला आला आहे. त्यात गेल्या दोन वर्षांपासून वाळू उपलब्ध होत नसल्याने, वाळूअभावी अनेक घरकुल लाभार्थ्यांचे बांधकाम बंद पडण्याची परिस्थिती ओढवली आहे. अद्यापही वाळूचा तिढा कायमच आहे.
महिनाभरापूर्वी 340 रुपये प्रतिबॅग असलेले सिमेंट आता 370 ते 380 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. याशिवाय 1 नोव्हेंबरपासून 410 रुपये प्रति बॅग होण्याची शक्यता आहे. जवळपास 20 टक्क्यांनी सिमेंटचे दर वधारले आहेत.
तालुक्यात, सध्या लाल विटांचे दर साडेसहा ते सात हजार रुपयांवर पोहोचले आहेत. तर सिमेंट विटांचे दर सहा हजार रुपयांवर आहेत. त्यामुळे घर बांधणे अडचणीचे आहे. तर अद्यापही रेती डेपो सुरु झाले नाहीत. त्यामुळे तालुक्यात ट्रॅक्टर चालक वारेमाप लुटत आहेत. ग्रामीण भागात नदीतील रेतीचे 8 ते 10 हजार रुपये दर आकारत आहेत.

 

- Advertisement -

सध्या बाजारात बांधकाम साहित्याचे दर वाढले आहेत.त्यामुळे गेल्या काही वर्षांपूर्वी घर बांधणी कामाचा खर्च काढला तर, सध्याचे बांधकाम साहित्याचे दर हे 20 ते 30 टक्क्यांनी वाढले आहेत. इतकेच नव्हे तर दिवाळी नंतर हे दर अधिक वाढण्याची शक्यता आहे.
– जावेद लुलानिया, बांधकाम साहित्य विक्रेता

 

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षांपासून घरकुल प्रोत्साहन अनुदान अगदी काठावर असून बांधकाम साहित्य, मजुरीचे दर आणि वाहतूक खर्च अधिक होत आहे. त्यामुळे कित्येक नागरिकांची बांधकामे ही अर्धवट राहिली आहेत. त्यामुळे शासनाने हे प्रोत्साहन अनुदान 2 लाख रुपयांपर्यंत वाढ करून लाभार्थ्यांना वाढीव मदत करण्याची नितांत गरज आहे.

– शिवा घरत, घरकुल लाभार्थी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -