घरपालघरगिल्बर्ट मेंडोंसांची राष्ट्रवादीत घरवापसी?; राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी

गिल्बर्ट मेंडोंसांची राष्ट्रवादीत घरवापसी?; राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी

Subscribe

पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीला पुन्हा उभारी मिळवून देण्यासाठी माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीला पुन्हा उभारी मिळवून देण्यासाठी माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे. गिल्बर्ट मेंडोंसा यांनी मीरा भाईंदर महापालिकेतील सत्ता मिळवून दिली होती. त्यानंतर ते स्वतः पहिले आमदार म्हणूनही निवडून आले होते. मात्र काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांना राजकीय शह देण्यासाठी माजी आमदार नरेंद्र मेहता यांना महौपारपदी बसवण्याची मेंडोंसा यांनी केलेली चूक त्यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात येण्यात झाली. मेहता यांनीच मेंडोंसा यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता. त्यानंतर महापालिकेतील सत्ताही भाजपला मिळवून दिली होती. त्यानंतर मेंडोंसा आणि हुसेन यांच्या राजकीय अस्तित्वालाच धक्का बसला होता. दुसरीकडे, वैयक्तिक पातळीवर मेंडोंसा अडचणीत आल्यानंतर त्यांना तुरुंगात जावे लागले होते. त्यांच्या पडत्या काळात मेंडोंसांनी राजकारणात मोठे केलेले बहुतेक मेहतांच्या गोटात सामिल झाले होते. तेव्हापासून राजकारणात मेंडोंना एकाकी पडले होते.

वैयक्तिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मेंडोंसांनी मग शिवसेनेचे शिवबंधन बांधले. असे असले तरी मेंडोंसांचा राजकारण आणि शहरातील दरारा संपुष्टात आल्याचेच चित्र आहे. मेंडोंसांच्या बरोबरीनेच गणेश नाईक, संजीव नाईक यांनी मीरा भाईंदर शहरात राष्ट्रवादीची सत्ता टिकवून ठेवली होती. आता नाईक पिता-पुत्रांनीही भाजपची वाट धरली असल्याने शहरात राष्ट्रवादीची अवस्था बिकट झाली असून राष्ट्रवादीला मेंडोंसांसारख्या नेत्याची उणिव भासू लागली आहे. म्हणूनच मेंडोंना पुन्हा राष्ट्रवादीत आणण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे नेते मीरा भाईंदर महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेता डॉ. आसिफ शेख यांनी मेंडोंसा यांना पुन्हा राष्ट्रवादीत आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शेख यांनी त्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन मेंडोंसांना पुन्हा राष्ट्रवादीत घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी आणि शहरात राष्ट्रवादी पुन्हा मजबूत करण्यासाठी मेंडोंसांशिवाय पर्याय नाही. त्यासाठी शरद पवारांसह पक्षातील ज्येष्ठ नेते, वरिष्ठांची भेट घेतली. सर्वच जण त्यासाठी अनुकूल आहेत. मेंडोंसादेखील राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक आहेत. पुढील महिन्यात ९ ऑक्टोबरला मेंडोंसांच्या वाढदिवस असून त्यादिवशी प्रवेशाची घोषणा होऊ शकते, अशी माहिती शेख यांनी दिली. प्रतिक्रियेसाठी मेंडोंसांशी संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा –

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे समूळ उच्चाटन करा – नाना पटोले

गिल्बर्ट मेंडोंसांची राष्ट्रवादीत घरवापसी?; राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -