घर पालघर वसईसाठी अतिरिक्त पाणीपुरवठा द्या,आमदार हितेंद्र ठाकूर यांची मागणी

वसईसाठी अतिरिक्त पाणीपुरवठा द्या,आमदार हितेंद्र ठाकूर यांची मागणी

Subscribe

उन्हाळ्यातील वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांना अतिरिक्त पाण्याची गरज भासत आहे.

वसईःराज्यभरात उन्हाचा पारा वाढत असून अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे. वसई-विरार भागातही नागरिकांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (एमएमआरडीए) आयुक्तांकडे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वसई-विरारमधील नागरिकांसाठी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. विरार फाटा येथील एमएमआरडीएच्या पाइपलाइनद्वारे शहरात पाणीपुरवठा झाल्यास हा अतिरिक्त पाणीपुरवठा होण्यास मदत होईल, असे ठाकूर यांचे मत आहे.

उन्हाळ्यातील वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांना अतिरिक्त पाण्याची गरज भासत आहे. याबाबत रहिवाशांच्या तक्रारी आल्यानंतर ठाकूर यांनी हे प्रकरण पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे नेले आणि या समस्येकडे प्राधान्याने लक्ष घालण्यास सांगितले. चव्हाण यांनी एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्याशी या विषयावर चर्चा केली. पाणी पुरवठ्याशी संबंधित लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणते उपाय उपलब्ध करून देता येतील यासंदर्भात ठाकूर यांनी चर्चा केली.विरार फाटा येथील पाईपलाईनद्वारे सध्या विरार भागात पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे या पाईपलाईनला अतिरिक्त पाणी पुरवठ्यासाठी जोडणी दिल्यास लोकांना पुरेसा पाणी पुरवठा उपलब्ध होईल. याबाबत पाईपलाईन आणि पाण्याचा दाब तपासण्यासाठी एक टीम नियुक्त करणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. त्यामुळे आता पाइपलाइनने अपेक्षित निकष पूर्ण केल्यास त्यातून पाणीपुरवठा कनेक्शन युद्धपातळीवर देण्याचे आदेश आयुक्त देणार आहेत.

- Advertisement -

एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्याशी परिसरातील पाणीपुरवठ्यात वाढ करण्याबाबत आम्ही चर्चा केली आहे. त्यांनी याप्रकरणी लक्ष घालून लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. नागरिकांच्या समस्या कमी व्हाव्यात आणि त्यांना त्रास न होता सर्व मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी आमचा संपूर्ण प्रयत्न आहे.” असे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -