भाईंदर :- मुंबई व उपनगरात दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सवासाठी गोविंदा पथकांकडून सराव केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही दहीहंडी फोडताना जखमी होणार्या गोविंदाला तातडीच्या उपचार मिळण्यासाठी सर्व प्रथम प्राधान्य देण्यात यावे, असे शासकीय रुग्णालयासह शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना आयुक्त संजय काटकर यांनी निर्देश दिले आहेत. राज्य शासनाने यावर्षी दहीहंडी उत्सवाला खेळाचा दर्जा दिला आहे. तसेच यावर्षीपासून गोविंदा प्रो ही स्पर्धा देखील सुरू केली आहे. या पथकातील गोविंदासाठी मोफत उपचारासाठी विमा दिला आहे. दहीहंडी उत्सवासाठी सर्व गोविंदा पथकांकडून मोठ्या प्रमाणात सराव केला जात आहे. दहीहंडी फोडत असताना अनेक गोविंदा जखमी होतात. यावेळी जखमी गोविंदांना अनेकवेळा तातडीचे उपचार मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना उपचाराअभावी जीव गमवावा लागतो. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबईतील सर्व रुग्णालयांमध्ये जखमी गोविंदांना तातडीचे उपचार मिळण्यासाठी काही बेड राखीव ठेवले जाणार आहेत. शासनाच्या निर्देशानुसार मीरा -भाईंदरमधील दहीहंडी उत्सवासाठी जखमी होणार्या गोविंदाला तातडीच्या उपचारासाठी प्राधान्य दिले जावे, जखमींना तात्काळ बेड उपलब्ध करून द्यावा , आवश्यकता असल्यास तातडीची शस्त्रक्रिया करण्यात यावी, असे निर्देश आयुक्तांनी महापालिकेच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय आणि भाईंदर पश्चिमेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी या शासकीय रुग्णालयासह शहरातील सर्व खासगी रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत.
जखमी गोविंदाला प्राधान्य द्या,आयुक्तांच्या रुग्णालयांना सूचना
असे निर्देश आयुक्तांनी महापालिकेच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय आणि भाईंदर पश्चिमेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी या शासकीय रुग्णालयासह शहरातील सर्व खासगी रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -