घरपालघरयंदा शेतकर्‍यांना १ हजार रुपये अनुदान द्या, आमदार सुनिल भुसारा यांची मागणी

यंदा शेतकर्‍यांना १ हजार रुपये अनुदान द्या, आमदार सुनिल भुसारा यांची मागणी

Subscribe

तसेच सदरचे पैसे थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जाणार असल्याने पारदर्शक कारभाराचा आधार घ्यावा, असेही यावेळी भुसारा यांनी सांगितले.

जव्हार: महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून होणार्‍या आधारभूत खरेदी केंद्राचे उद्घाटन आज आमदार सुनिल भुसारा यांच्या हस्ते जव्हार आणि मोखाडा येथे झाले. यावेळी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक म्हणून बोलताना भुसारा म्हणाले की, यंदा महामंडळाकडून प्रति क्वींटल २ हजार ४० रुपये एवढा भाव दिला असून व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची फसवणूक होवू नये, यासाठी महामंडळाच्या खरेदी केंद्रावर आपले धान्य द्यावे असे आवाहन भुसारा यांनी यावेळी केले.तसेच सदरचे पैसे थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जाणार असल्याने पारदर्शक कारभाराचा आधार घ्यावा, असेही यावेळी भुसारा यांनी सांगितले.

तसेच मागील सरकारच्या काळात आम्ही महामंडळाच्या केंद्रावर धान्य देणार्‍या शेतकर्‍यांना ७०० रुपयांचे अनुदान दिले होते. आताची वाढलेली महागाई पाहता यंदा अनुदान म्हणून १ हजार रुपये द्यावे, अशी मागणी भुसारा यांनी केली. तसेच या आधारभूत खरेदीमध्ये १ क्वींटलवरील धान्यच खरेदी करता येते. यामुळे अप्लभूधारक शेतकर्‍यांची अडचण होते. यासाठी एकाधिकार खरेदी योजनाही सुरू करावी, अशी मागणी यावेळी सरकारकडे भुसारा यांनी केली आहे. यावेळी जिप सदस्य हबीब शेख,प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे उपप्रादेशिक व्यवस्थापक पवार तसेच शेतकरी आदी उपस्थित होते. यानंतर वाडा- विक्रमगड जव्हार या भागातही आधारभूत खरेदी केंद्रे सुरू होणार आहेत. तसेच या भागात पिकाचे नुकसान कमी झालेले असले तरी शासनाने पंचनामे करून ज्यांचे नुकसान झाले आह,े त्यांना तात्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी आमदार भुसारा यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -