घर पालघर वीटभट्टी मालकांना यंदा सुगीचे दिवस

वीटभट्टी मालकांना यंदा सुगीचे दिवस

Subscribe

वाढता खर्च पाहता विटभट्टी मालकांनी विटांचे दर वाढवले आहेत. तरीही यंदा विटांची मागणी वाढली आहे. यंदा तालुक्यात विटभट्टी वाढल्या असल्या तरी मागणी पाहता उत्पादना कमी अशी स्थिती आहे.

विक्रमगडः कोरोना काळापासून गेली तीन वर्षे मंदीच्या सावटाखाली असलेल्या वीटभट्टी व्यवसायात यंदा तेजी आल्याचे दिसत आहे. विटांची मागणी वाढली असतानाच दरही चांगला मिळत असल्याने वीटभट्टी मालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या तीन वर्षांपासून विटांचे भाव पडले. वीटभट्टी व्यवसायाला मोठी घरघर लागली होती. एकेकाळी विटांचा भाव हा शेकडा साडेचार ते पाच हजारांपर्यंत होते. ते गेल्या तीन वर्षात एकदम अडीच हजार रुपयांवर खाली आले होते. वीटभट्टी मालक मंदीच्या सावटामुळे संकटात सापडले होते. विटांसाठी मुखत्वे करुन तुस,दगडी,कोळसा,माती,भट्टीसाठी जागा,त्याकरता लागणारा मजुरवर्ग,तात्पुरती बिनशेती करण्याचा परवानगी,रॉयल्टी,जमिनीचा धारा आदींसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत जादा पैसे मोजावे लागत असल्याने त्याचा परिणाम विट उत्पादनावर होऊन विटांच्या किंमतीही खाली घसरल्याने वीटभट्टी मालकांनी धास्ती घेतली होती.वाढता खर्च पाहता विटभट्टी मालकांनी विटांचे दर वाढवले आहेत. तरीही यंदा विटांची मागणी वाढली आहे. यंदा तालुक्यात विटभट्टी वाढल्या असल्या तरी मागणी पाहता उत्पादना कमी अशी स्थिती आहे. विक्रमगड हे पंचक्रोशीत वीटभटटयांचे माहेरघर म्हणून प्रसिध्द आहे. मुंबई व उपनगरात इमारतीच्या बांधकांमासाठी बहुतांशी विटा येथील भटटयांमधून पुरवण्यात येतात. माती आणि मुबलक पाणी यामुळे येथे हा व्यवसाय वाढला आहे. त्यातच दगडी कोळसा व तुस विक्रमगड तालुक्यातच उपलब्ध होऊ लागल्याने वीटभटटी व्यवसाय भरभराटीस आला आहे. मात्र. यंदाही वीट तयार करण्यासाठी आवश्यक माती, दगडी कोळसा, गंधक यांच्या दरात वाढ झाली आहे. त्यातच वीट तयार करण्याच्या मेहनतीच्या कामाला मजूर मिळत नसल्याने त्याचा फटकाही या व्यवसायाला बसत आहे. परिणामी वीटांचे दर वाढले आहेत.

 

- Advertisement -

तुस,दगडी कोळसा,माती,भट्टीसाठी जागा,त्याकरता लागणारा मजुरवर्ग,तात्पुरती बिनशेती करण्याचा परवानगी,रॉयल्टी,जमिनीचा धारा आदींसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत जादा पैसे मोजावे लागत असल्याने विटांचे दर यंदा वाढले आहेत.

-रणधीर पाटील, वीट उत्पादक, ओंदे गाव

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -