घरपालघरमीरा -भाईंदरमध्ये नाट्यमहोत्सवाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद

मीरा -भाईंदरमध्ये नाट्यमहोत्सवाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद

Subscribe

लता मंगेशकर नाट्यगृह भव्य असे बनवले असून नाट्यगृहाच्या आवारातही भरपूर मोकळी जागा आहे, त्यामुळे या नाट्यगृहातही वाचनालय सुरू करावे, अशी अपेक्षा प्रशांत दामले यांनी व्यक्त केली.

भाईंदर :- मीरा- भाईंदर शहरात लता मंगेशकर नाट्यगृह सुरू झाल्यानंतर १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत प्रथमच नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्यमहोत्सवाला शहरातील प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. या महोत्सवात सुपरहिट झालेल्या नाटकाचा प्रयोग ठेवण्यात आले आहेत. एका लग्नाची दुसरी गोष्ट या नाटकाचा प्रयोग झाला. काशीमीरा येथे असलेल्या लता मंगेशकर नाट्यगृहात दिवाळीनिमित्त मीरा-भाईंदर महापालिका व आमदार प्रताप सरनाईक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी नाट्य रसिकांसाठी विनामूल्य नाट्यमहोत्सव आयोजन केले आहे. महोत्सवाची सुरुवात प्रशांत दामले यांच्या ’एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगाने झाली. यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रशांत दामले यांचा सत्कार केला. यावेळी दामले म्हणाले की शहरातील नाट्यरशिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. लता मंगेशकर नाट्यगृह भव्य असे बनवले असून नाट्यगृहाच्या आवारातही भरपूर मोकळी जागा आहे, त्यामुळे या नाट्यगृहातही वाचनालय सुरू करावे, अशी अपेक्षा प्रशांत दामले यांनी व्यक्त केली.

तसेच या महोत्सवातील दुसरा नाट्यप्रयोग अभिनेते भरत जाधव यांच्या ’तू तू मी मी’ नाटकाचा होता, या प्रयोगालाही रसिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. नाट्यमहोत्सवाचा समारोप आज शुक्रवारी ’देवबाभळी’ या नाट्यप्रयोगाने होणार आहे. मीरा -भाईंदर शहरात व मुख्य म्हणजे महामार्गाच्या बाजूला लता मंगेशकर हे नाट्यगृह सुंदर बनवले आहे. या नाट्यगृहात छोट्या समस्या आहेत त्या दूर होतील. भव्य नाट्यगृह बनवले आहे ते कायम सुरू राहणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रेक्षकांनी नियमित नाटकांचे प्रयोग पाहावेत, असे आवाहन अभिनेता भारत जाधव यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -