Eco friendly bappa Competition
घर पालघर शौचालयात नोकरी मिळाली,केले भलतेच धंदे सुरू

शौचालयात नोकरी मिळाली,केले भलतेच धंदे सुरू

Subscribe

पोलिसांनी ७८ हजार ८६५ रुपयांचा गुटखा जप्त करत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. नवाब शमशुद्दीन कुरेशी असे त्याचे नाव आहे.

भाईंदर :गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात गुटखा विक्रीला आळा प्रयत्न केले जात आहेत.परंतु,हे गुटखामाफिया कोणती ना कोणती क्लुप्ती शोधून काढत आपला अवैध धंदा चालू ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.मीरा-भाईंदर शहरात तर या गुटखाविक्रेत्याने कहरच केला आहे. मीरा -भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयात आता गुटखा विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे. भाईंदर पूर्वेस आझादनगर गल्ली नं. २ येथील सार्वजनिक शौचालयामध्ये नोकरी करणारा एक व्यक्ती तेथेच गुटखा, पान मसाला सुगंधित तंबाखु असा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला माल लोकांना विक्री करत असताना आढळून आला आहे. पोलिसांनी ७८ हजार ८६५ रुपयांचा गुटखा जप्त करत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. नवाब शमशुद्दीन कुरेशी असे त्याचे नाव आहे.

त्याच्याकडून गुटखाच्या एकूण दोन पांढर्‍या प्लास्टीकच्या गोण्या, प्रत्येक गोणीमध्ये 35 पाकीटे, ६ हजार ३०० केके नावाच्या गुटख्याची १ पांढरी प्लास्टीकच्या गोणी, गोणीत 30 पाकीटे, प्रत्येक पाकीटाची किंमत २१० रुपये, ७ हजार ३५० फाईव्ह एच के छोटा नावाच्या गुटखाच्या १ पांढरी प्लास्टीकची गोणी त्यात गोणीमध्ये 35 पाकीटे, प्रत्येक पाकिटाची किंमत २१० रुपये, ५ हजार ८८० रुपयांचा रोकडा पान मसाला गुटख्याची १ पांढरी प्लास्टीकची गोणी, गोणीमध्ये ४९ पाकीटे, प्रत्येक पाकीटाची किंमत १२०० रु.असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच ३ हजार ८४० रु. राज निवास पान मसाला गुटखाच्या १ पांढरी प्लास्टीकची गोणी, गोणीमध्ये ४९ पाकीटे, प्रत्येक पाकीटाची किंमत १२०/- रु. व २८२०/- रु. विमल पान मसाला ५० रु वाला गुटखाच्या १ लहान पांढरी गोणी, त्या गोणीमध्ये ६ व अन्य गुटखा देखील जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार राजू तांबे व संदीप शिंदे, पोलीस हवालदार समिर यादव व विकास राजपूत यांनी केली आहे. पुढील तपास नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार हे करत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -