घरपालघरवसईत पासपोर्ट कार्यालयासाठी जागा मिळाली ..लवकरच पासपोर्ट मिळणार

वसईत पासपोर्ट कार्यालयासाठी जागा मिळाली ..लवकरच पासपोर्ट मिळणार

Subscribe

वसई -विरार तालुक्याची लोकसंख्या पंचवीस लाखांच्या घरात पोहचली आहे. वसईच्या पश्चिम किनारपट्टीसह शहरातील नागरिक शिक्षण, नोकरीसह पर्यटनासाठी मोठ्या संख्येने परदेशात जात असतात.

वसई : गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर मंगळवारपासून वसईत पासपोर्ट कार्यालय सुरु होत आहे. वसई पूर्वेकडील एव्हरशाईन सिटी येथील टपाल कार्यालयात पासपोर्ट कार्यालय सुरु होईल. त्यामुळे पालघर जिल्ह्यासह वसई- विरारवासियांना पासपोर्टसाठी कराव्या लागणार्‍या मुंबई आणि ठाण्याच्या वार्‍या बंद होणार आहेत. वसई -विरार तालुक्याची लोकसंख्या पंचवीस लाखांच्या घरात पोहचली आहे. वसईच्या पश्चिम किनारपट्टीसह शहरातील नागरिक शिक्षण, नोकरीसह पर्यटनासाठी मोठ्या संख्येने परदेशात जात असतात. पण, स्वतंत्र जिल्हा होऊनही पासपोर्ट कार्यालय नसल्याने मुंबई किंवा ठाण्याला फेर्‍या माराव्या लागत होत्या. त्यामुळे पालघर जिल्ह्यासाठी पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याची मागणी केली जात होती.

२०१९ साली खासदार राजेंद्र गावीत यांनी तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज्य यांची भेट घेऊन पासपोर्ट कार्यालयाला मंजुरी घेतली होती. पासपोर्ट कार्यालय पालघरमध्ये होणार याची माहिती मिळताच वसईकरांनी वसईत कार्यालय सुरु करण्याचा आग्रह धरला होता. यातही खासदार राजेंद्र गावीत यांनी लक्ष घातल्यानंतर वसईत कार्यालयाला मंजुरी केंद्र सरकारने दिली होती. पण, जागेअभावी हा कार्यालयाचा प्रश्न रखडून पडला होता.
अखेर मंजुरीच्या दोन वर्षांनी वसईतील कार्यालयाला जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या वसई पूर्वेकडील एव्हरशाईन सिटी येथील टपाल कार्यालयातूनच पासपोर्ट कार्यालयाचे काम चालणार आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यासह वसई- विरार परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. खासदार राजेंद्र गावीत यांच्या हस्ते मंगळवारी पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -