घरपालघरवाढवणच्या जनसुनावणीला ग्रामपंचायतींचा विरोध

वाढवणच्या जनसुनावणीला ग्रामपंचायतींचा विरोध

Subscribe

वाणगावपर्यंत १२ किलोमीटर  लांबीचा रेल्वेमार्ग यासाठी ५७१ हेक्टर जमीन गरजेची आहे. यासाठी पर्यावरण विषयक परवानगीसाठी जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.

पालघरः वाढवण बंदराच्या उभारणीसाठी पर्यावरणीय मंजुरी मिळवण्याच्या प्रक्रियेअंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २२ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी आयोजित केली आहे. ही जनसुनावणी किमान दोन ते तीन महिन्यांनी पुढे ढकलण्यात यावीअशी मागणी बंदरामुळे बाधित होणाऱ्या डहाणू तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी केली आहे. याबाबत वाढवणटिघरेपाडा येथे झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला.वाढवण बंदर उभारणीच्या पहिल्या टप्प्यात नऊ कंटेनर टर्मिनलचार बहुउद्देशीय धक्केचार लिक्विड धक्केरो रो धक्काकोस्टल धक्का१०.१४ किलोमीटर लांबीची वॉटरब्रेकिंग वॉलड्रेजिंग आणि कंटेनर तसेच कार्गो स्टोरेज इत्यादींसाठी लागणाऱ्या क्षेत्रासाठी समुद्रात एक हजार ४४८ हेक्टरवर दगडमातीचा भराव केला जाणार आहे. वाढवण समुद्र ते राष्ट्रीय महामार्गावरील तवा गावापर्यंत ३५ किलोमीटर लांबीचा रस्ता आणि वाणगावपर्यंत १२ किलोमीटर  लांबीचा रेल्वेमार्ग यासाठी ५७१ हेक्टर जमीन गरजेची आहे. यासाठी पर्यावरण विषयक परवानगीसाठी जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.

बाधित होणाऱ्या बहुतेक ग्रामपंचायतींकडे जेएनपीकडून पर्यावरणविषयक अभ्यास अहवाल आलेले नाहीत. काही ग्रामपंचायतींकडे आलेले अभ्यास अहवाल इंग्रजीमध्ये आहेत. ते मराठीत द्यावेतकाही पर्यावरणीय बाबींचा अभ्यास झालेला नाहीतो पूर्ण करावात्याचप्रमाणे वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीने मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेची सुनावणी होईपर्यंत २२ डिसेंबरची प्रस्तावित जनसुनावणी पुढे ढकलावीअशी मागणी सरपंचांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.वाढवण बंदरामुळे बाधित होणाऱ्या ३० ग्रामपंचायतींचे सरपंचउपसरपंच आणि सदस्यांची विशेष सभा वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीने नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. या सभेला नॅशनल फिशवर्कर फोरमच्या ज्योती मेहेरठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छिमार संघाचे जयप्रकाश भायठाणे जिल्हा मच्छिमार समाज संघाचे मानेन्द्र आरेकर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -