घरपालघरआजी मानले ! रस्त्यावरून थेट आकाशात नेले

आजी मानले ! रस्त्यावरून थेट आकाशात नेले

Subscribe

या तरुणाने आपल्या स्वत:च्या खर्चाने दोन्ही वृद्ध महिलांना आयुष्यामधील पहिली हवाई यात्रा घडवून आणली आहे.

विरार : हवाईमार्गाने प्रवास करण्याचे बर्‍याच जणांचे स्वप्न असते. हवाई सफर करण्याची इच्छा प्रत्येकालाच असते.परंतु,काही जण इतरांच्या चेहर्‍यावरील हास्याला आपले स्वप्न समजतात .अशा अवलियांपैकी एक म्हणजे यश माने. यशने ज्यांनी ध्यानी, मनी किंवा स्वप्नी पण असा प्रवास करण्याचा विचार केला नसेल, अशा दोन महिलांना हवाई प्रवास घडवला आहे. यश माने या तरुणाने आपल्या स्वत:च्या खर्चाने दोन्ही वृद्ध महिलांना आयुष्यामधील पहिली हवाई यात्रा घडवून आणली आहे.
माणिपूर परिसरातील रस्त्यावर शोभाबाई पवार(६२) सरूबाई पवार (७४) नावाच्या दोन वृद्ध महिला भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात. एकेदिवशी यश माने तेथे समाजकार्य करत असताना या महिलांशी त्याची भेट झाली. यशला आजी नसल्याने या वृद्ध महिलांना आजी समजून त्यांच्या इच्छा, स्वप्न पूर्ण करण्याचे त्याने ठरविले. या महिलांनी हवाई सफर करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे यश माने या तरुणाने त्यांना थेट हेलिकॉप्टर सफर घडवण्याचे ठरवले. त्यानंतर त्याने या दोन्ही वृद्ध महिलांना हेलिकॉप्टर सफर घडवली. मंगळवारी (22) दुपारच्या सुमारास यशने मुंबईच्या सांताक्रूझ येथून उड्डाण करत वरळी सिलिंक ते वसई, विरार आणि ठाणे अशी ४० मिनिटांची हवाई सफर त्या महिलांसोबत केली. या अनपेक्षित हवाई सफरीने दोन्ही महिलांना प्रचंड आनंद झाला. रस्त्यात भीक मागून पोट भरणार्‍या महिलांना या तरुणाने हेलिकॉप्टरची सफर घडवून आणल्याने आकाशात भरारी संधी घेण्याची त्यांना मिळाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -