घरपालघरसृष्टीतील गृहनिर्माण प्रकल्पाला हरित लवादाचा दणका

सृष्टीतील गृहनिर्माण प्रकल्पाला हरित लवादाचा दणका

Subscribe

विना शासनाची पर्यावरण परवानगी न-घेता अनधिकृत बांधकाम व खोदकाम केल्याने हरित लवादाने तीन सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याने सृष्टी प्रकल्पास न्यायालयाने दणका दिला आहे,

भाईंदर :- मीरा -भाईंदर महानगर पालिका हद्दीतील मीरारोड पूर्व येथील विकासक एव्हरस्माईल प्रा.ली. यांच्या सृष्टी सेक्टर -२ (अ) मध्ये गृहनिर्माण प्रकल्प बांधणी प्रकल्पाला हरित लवादाने दणका दिला आहे. सीआरझेड बाधित जागेत विना शासनाची पर्यावरण परवानगी न-घेता अनधिकृत बांधकाम व खोदकाम केल्याने हरित लवादाने तीन सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याने सृष्टी प्रकल्पास न्यायालयाने दणका दिला आहे, यामुळे असंख्य लोकांनी केलेली गुंतवणूक धोक्यात येण्याची शक्यता आहे. सदरील आदेश हे न्यायाधीश दिनेश सिंह व डॉ. विजय कुलकर्णी यांच्या खंडपीठाने आदेश दिले आहेत. तर याचिका कर्त्यांचे काम अ‍ॅड. नितीन लोणकर, सोनाली सूर्यवंशी, तानाजी गंभीरे यांनी कामकाज पाहिले आहे.

सागरी किनारा व्यवस्थापन समिती पर्यावरण विभाग यांचे अधिसूचना व पर्यावरण विभाग भारत सरकार यांच्या 2006 यांच्या अधिसूचने नुसार बांधकाम करण्या अगोदर पूर्व पर्यावरण परवानगी घेणे आवश्यक आहे. असे असतानाही विकासकाने 3 लाख 23 हजार 656 मीटरची बांधकाम परवानगी घेत त्याठिकाणी पर्यावरण विभागाची परवानगी न-घेता पूर्णभरण करून बांधकाम सुरुवात केले. मात्र महापालिकेने बांधकाम परवानगी देताना अटी शर्तींमध्ये स्पष्टपणे पर्यावरण विभागाची परवानगी घेऊनच बांधकाम करण्यात यावे, असे सांगितले असतानाही विकासकाने सदरील जागेवर खोदकाम व बांधकाम करत योग्य त्या उपाययोजना न करता बांधकाम सुरूच ठेवले.

- Advertisement -

मीरारोड पूर्व मौजे पेनकर पाडा येथील सर्व्हे क्रमांक ६५ व ६८, ६९ या ठिकाणी सीआरझेड १ व सीआरझेड २ मध्ये तसेच उच्चतम भरती रेषा (हाय टाईड लाईन) असलेल्या याा जागेवर महापालिकेकडून पर्यावरण विभागाची परवानगी घेऊन बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र विकासकांनी सीआरझेड बाधित जागा असतानाही त्या ठिकाणी शासनाच्या पर्यावरण विभागाची कुठलीही परवानगी न-घेता बेसमेंट अधिक, पोडीयम व तळ अधिक नऊ मजल्याच्या इमारती बांधल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -