घरपालघरशासकीय कार्यालयातील तक्रार पेट्या गायब

शासकीय कार्यालयातील तक्रार पेट्या गायब

Subscribe

त्यामुळे शासकीय सूचनांना बगल देऊन प्रशासकीय कामकाज जोरात सुरू असल्याचे भासविले जात आहे.

जव्हार: शासकीय कार्यालयातील निमशासकीय कामकाज कर्मचार्‍यांच्या कार्यपद्धतीत अनेक तक्रारी असतात. आपल्या तक्रारी वरिष्ठांसमक्ष जाणार या हेतूने संबंधित विभागाच्या प्रशासनाच्या दिशानिर्देशाने बहुतांश शासकीय कार्यालयांत तक्रारपेट्या कार्यालयांत लावण्यात आल्या होत्या. मात्र, आता या तक्रारपेट्या गायब झाल्याचे दिसून येत आहे. संबंधितांची तक्रार करावी कुठे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. शासनाच्या तक्रार पेट्या लावण्याच्या सूचना असताना देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. विशेष म्हणजे एखाद्या भ्रष्ट प्रशासकीय अधिकार्‍यांबाबत तक्रार करायची झाल्यास नेमकी कुठे करायची? त्यासाठीचे पत्र कुठे द्यायचे? याबाबत संभ्रम कायम आहे. या आधी तक्रार पेटी प्रत्येक कार्यालयात उपलब्ध असायची, त्यामुळे तक्रार करणे सोपे व अधिकारी याबाबत सावध असायचे परंतु आता तक्रार पेटी उपलब्ध नाही, त्यामुळे शासकीय सूचनांना बगल देऊन प्रशासकीय कामकाज जोरात सुरू असल्याचे भासविले जात आहे.
शासकीय कार्यालयात येणार्‍या सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, तसेच एखाद्या अधिकारी व कर्मचार्‍याच्या कामाबाबत तक्रार असेल तर ती लेखी मांडता यावी, याकरिता सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये तक्रार व सूचनापेटी लावण्याच्या सूचना आहेत.परंतु तालुक्यातील एकाही कार्यालयात अशा प्रकारची सूचनापेटी दिसून येत नाही. यापूर्वी काही ठिकाणी बसविण्यात आलेल्या तक्रारपेट्याही गायब करण्यात आल्या आहेत.

 

- Advertisement -

पंचायत समिती कार्यालयातील तक्रारपेटी तुटलेली आहे. प्रशासन कार्य पद्धती बाबत तक्रार करायची झाल्यास आवक – जावक लिपिक आहेत, त्यांच्याकडे तक्रार अर्ज देता येऊ शकतो. पेटी दुरुस्ती करून लवकरच त्याच्या ठिकाणी लावण्यात येईल.
समीर वाठारकर, गट विकास अधिकारी,पंचायत समिती,जव्हार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -