फ्रिजच्या जमान्यात माठांना वाढती मागणी

तसेच विक्रमगडच्या कुंभारवाडयात एक फेरफटका मारला तर माठांच्या मागणी वाढ होत असल्याचे दिसून आले.

विक्रमगडः यंदा फ्रेबुवारी अखेरीस उन्हयाची चाहूल लागलेली आहे. त्यामुळे सारखेच गार पाणी हवे असते. फ्रीजमधीलच गार पाणी पिण्यार्‍यांची संख्या प्रचंड असली तरीही गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणार्‍या माठातल्या पाण्याच्या नैसर्गिक व शरिरास उपाय कारक असणार्‍या गारव्याचे चाहतेही काही कमी नाहीत. सध्या गुजरात-भिलाड येथील माठ बाजारात दाखल झालेले आहेत. डोक्यावर माठ घेऊन शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये लोक डोक्यावर माठ घेऊन विक्रीसाठी फिरतांना दिसत आहेत. तसेच विक्रमगडच्या कुंभारवाडयात एक फेरफटका मारला तर माठांच्या मागणी वाढ होत असल्याचे दिसून आले.

माठ विक्रीबरोबर येथील कुंभारवाडयात डिसेंबरपासूनच माठ बनवण्याचे काम सुरु होते. गुजरात येथून माठासाठी लागणारी माती आणली जाते. त्यानंतर मातीवर प्रक्रिया केली जाते. त्यामधून आकर्षक वा डिजाईनचे माठ बनवले जातात. पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे आजोबा आणि वडिलांपासून कुंभार व्यवसाय असल्याचे व्यावसायिक कल्पेश प्रजापती यांनी सांगितले. आता तिसर्‍या पिढीनेही हाच व्यवसाय स्विकारला आहे.

यासोबत आता गुजरातमधील भिलाडचे माठ मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आले आहेत. माठ विक्रेते बाजारात बसत आहेच, सोबतच शहर आणि गावातही फिरून व्यवसाय करत आहेत. फ्रीजच्या पाण्यापेक्षा माठातील पाण्याला वेगळाच गोडवा असतो. शिवाय माठातील पाणी आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही उत्तम असते. माठाच्या किंमती सर्वांच्या खिशाला परवडणार्‍या असल्यामुळे त्यांची विक्री जास्त होते, असे व्यावसायिक सांगतात. यंदा नक्षीकाम केलेले माठ बाजारात विक्रीसाठी आले आहेत. अनेक माठांना नळही बसवण्यात आलेले असतात. यंदा माठ्यांच्या किंमती दोनशे ते साडेतीनशेच्या घरात आहेत.