घरपालघरमहाविद्यालयीन विद्यार्थी रमले बाळगोपाळांमध्ये

महाविद्यालयीन विद्यार्थी रमले बाळगोपाळांमध्ये

Subscribe

खेळांच्या स्पर्धांचे आयोजन तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आदी अनेक अभिनव उपक्रमांचा समावेश होता.

वसईः शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने ज्ञानदीप सप्ताहाचे आयोजन केले होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शत्रुघ्न फड व प्रा. आदिती यादव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सप्ताहामध्ये शाळा व शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे अनेक उपक्रम राबवण्यात आले. यावेळी शाळेच्या आवाराची व पटांगणाची स्वच्छ्ता, शाळेच्या भिंतींचे रंगकाम व सुशोभीकरण, शाळेसाठी शैक्षणिक तक्ते तयार करणे, प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना स्पर्शज्ञानाची (गुड टच व बॅड टच)ओळख, नाट्यरुपी सादरीकरणाद्वारे मोबाईल अतिवापराच्या दुष्परिणामांची ओळख, शालेय विद्यार्थ्यांसाठी मैदानी खेळ व बौद्धिक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आदी अनेक अभिनव उपक्रमांचा समावेश होता.

नवघर, माणिकपूर व उमेळे या वसईतील तीन गावांमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये हे उपक्रम राबवले गेले. विद्यार्थ्यांना सामाजिक प्रश्नांची जाणीव व्हावी आणि त्यांची ऊर्जा विविध समाजोपयोगी कार्य करण्यासाठी वापरली जावी, असे प्रतिपादन करत प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी यावेळी केले. हा सप्ताह राबवताना प्रतिदिन ६० ते ७० स्वयंसेवक कार्यरत राहून आपले योगदान देत होते. या सप्ताहाच्या आयोजनासाठी प्रा. लतिका पाटील यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थी प्रतिनिधी मनीषा राजपूत, प्रियंका पुजारी, आशुतोष शर्मा, योगेश साळुंखे व साहिल तिवारी यांनी या सप्ताहाची रूपरेषा निश्चित करून प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -