घरपालघरखोडाळा परिसरात अवकाळी पावसाचा कहर; अंतिम टप्प्यात असलेल्या भातशेतीचे नुकसान

खोडाळा परिसरात अवकाळी पावसाचा कहर; अंतिम टप्प्यात असलेल्या भातशेतीचे नुकसान

Subscribe

एकीकडे कोरोनामुळे ओढावलेले आर्थिक संकट असताना दुसरीकडे उसनवारी करून पोटच्या पोरासारखे जोपासलेल्या हातातोंडाशी आलेल्या भातपिकांचे ढगाळ वातावरण, अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

एकीकडे कोरोनामुळे ओढावलेले आर्थिक संकट असताना दुसरीकडे उसनवारी करून पोटच्या पोरासारखे जोपासलेल्या हातातोंडाशी आलेल्या भातपिकांचे ढगाळ वातावरण, अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या भातशेती अंतिम टप्प्यात असून मागील पंधरवड्यात पडलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे भातशेतीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे ३००-४०० रुपये रोज देऊन रोजंदारीने मजूरांवर अवाजवी पैसे खर्च करून शेतकरी हातात सापडेल, तसे भातपिके काढणीसाठी रात्रंदिवस परिश्रम घेताना दिसत आहे. अशा परिस्थितीत अवकाळीसारखे अस्मानी संकट पुन्हा-पुन्हा शेतकर्‍यांच्या मुळावर सर्रासपणे चालून येत आहे. या परिस्थितीमुळे शेतकर्‍यांच्या भातपिकांसह गुरे, वासरे व मुक्या प्राण्यांच्या वैरण, गवत, काडी, चार्‍याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बुधवारच्या सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे मोखाडा तालुक्यात सर्वच ठिकाणी जोरदार अतिवृष्टी होऊन दिवसभर संततधार कोसळली. ढगाळ वातावरणामुळे कडाक्याच्या थंडीत अंतिम टप्प्यात असलेल्या भातपिकांचे अतिवृष्टीमुळे पुन्हा नुकसान झाले. पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. शेतातील कामात हतबल होऊन व्यग्र असलेला मजूर, शेतकरीवर्ग भातपिकांचे संरक्षण करण्यासाठी आला. दरम्यान, मोखाडा तालुक्यात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस बरसला. यामुळे सर्वत्र तालुकाभर जम्मू काश्मीरसारखे थंड वातावरण तयार झाले.

- Advertisement -

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवारी दिवसभर पाऊस पडल्यानंतर उसंत घेईल, असे वाटत असताना रात्रभर वारा, पाऊस आणि गारठ्याने पावसाची संततधार सुरू होती. त्यादरम्यान, रात्रभर वीजपुरवठा खंडित होऊन काळोखमय परिसर बनला होता. या अतिवृष्टीमुळे नद्या-नाले ओसंडून वाहू लागले. तर अनेक शेतकर्‍यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचलेले आहे. पावसाळी वातावरणामुळे अनेक शेतकरी शेतातील भातपिकांचे, वैरणीचे पावसापासूनच संरक्षण करण्यासाठी झाकण म्हणून प्लास्टिक, कागद, ताडपत्रीचा आधार घेत आहे.

हेही वाचा –

मी सीडी बाहेर काढली तर भाजपला तोंड दाखवायला जागा उरणार नाही; नवाब मलिकांचा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -