घरपालघरवसई पूर्वेकडील फादरवाडीत आरोग्य केंद्र

वसई पूर्वेकडील फादरवाडीत आरोग्य केंद्र

Subscribe

त्यावेळी महापालिकेने या इमारतीत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करणार असल्याची लेखी माहिती दिली.

वसईः वसई पूर्वेकडील फादरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पाडून त्याठिकाणी बहुउद्देशिय इमारत बांधण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. या इमारतीत महापालिकेचे रुग्णालय अथवा प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करावे, अशी मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका शिल्पा सिंग यांनी केली होती. पण, त्याकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याच्या सिंग यांनी केलेल्या तक्रारीवरून आमदार प्रसाद लाड यांनी सध्या सुरु असलेल्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी महापालिकेने या इमारतीत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करणार असल्याची लेखी माहिती दिली.

महापालिका क्षेत्रामधील वार्ड क्रमांक ७७ मध्ये फादरवाडी येथे सध्या बहुउद्देशीय महापालिका इमारतीचे बांकाम सुरु असून ते पूर्णत्वास आले आहे. सदर इमारतीच्या जागी पूर्वी जिल्हा प्रशासनाचे फादरवाडीतील प्राथमिक आरोग्य केंद्र अस्तित्वात होते. ते तोडून नवीन बहुउद्देशीय इमारतीचे बांधकाम सुरु आहे. त्या इमारतीमध्ये महापालिकेचे आरोग्य केंद्र अथवा रुग्णालय प्रस्तावित करावे अशी मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका शिल्पा सिंग यांनी सप्टेंबर, २०२२ पासून लावून धरली होती. परंतु महापालिकेकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. त्यासाठी स्मरणपत्रे देखील महापालिका आयुक्तांना देण्यात आली होती. फादरवाडी येथील नवनिर्मित बहुउद्देशीय इमारतीमध्ये रुग्णालय अथवा आरोग्य केंद्र प्रस्तावित नसल्याचे अथवा तसा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे जेव्हा सिंग यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी राज्य सरकारकडे तक्रार केली होती. याप्रकरणी आमदार प्रसाद लाड यांनी हा प्रश्न सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपस्थित केला होता. त्यानंतर सभागृहमध्ये या प्रश्नावर चर्चा करण्यात आली असून त्यावर महापालिकेने सकारात्मक उत्तर दिलेले आहे. त्यासंबंधीची सविस्तर माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लेखी उत्तरात दिली आहे.स्थानिक लोकप्रतिनिधींनी आरोग्य केंद्राची मागणी केली असून फादरवाडी येथे होत असलेल्या बहुउद्देशीय इमारतीमध्ये पहिल्या व दुसर्‍या मजल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र प्रस्तावित केले आहे. त्याची अंतर्गत रचना आणि आवश्यक कामांसाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरु असल्याची माहिती महापालिकेने सभागृहाला दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -