घरपालघरचास आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

चास आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

Subscribe

असा भयानक प्रकार गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असतानाही आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक, अधिक्षक यांनी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी विहिरीतील पाणी उपलब्ध करून देण्याचा त्रासही घेतला नाही हे मोठे नवल आहे.

ज्ञानेश्वर पालवे, मोखाडा:  ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना निवासी शालेय शिक्षण घेता यावे, यासाठी महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून शासकीय निवासी आश्रमशाळा ग्रामीण भागात सुरू करण्यात आल्या. परंतु, याच निवासी आश्रमशाळा आता आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवांवर बेतू लागल्या आहेत.कारण, चक्क चास आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना प्यायला पाणी नसल्याने इमारत बांधकामासाठी वापरली जात असलेल्या नदीतील पाणी पिऊन आपली तहान भागवायची वेळ आली आहे. मात्र, असा भयानक प्रकार गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असतानाही आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक, अधिक्षक यांनी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी विहिरीतील पाणी उपलब्ध करून देण्याचा त्रासही घेतला नाही हे मोठे नवल आहे.

तालुका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चास येथे जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाची शासकीय निवासी आश्रमशाळा आहे. या चास आश्रमशाळेत जवळपास १११आश्रमीय निवासी विद्यार्थी तर १२२ आश्रमीय निवासी विद्यार्थीनी असे मिळून २३३ एकूण विद्यार्थी निवासी आहेत. तर बहिस्थ व शैक्षणिक सवलत असलेले असे १२४ म्हणजे जवळपास ३५७ विद्यार्थी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत.परंतु, शैक्षणिक शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी आपली तब्येत पण जोपासण्याची तेवढीच गरज आहे. किंबहुना तेथील मुख्याध्यापक, अधिक्षक,शिक्षक यांनी देखील विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.मात्र, असे असतानाही या शाळेत गेल्या तीन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणीच मिळत नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपली तहान भागविण्यासाठी शाळेच्या परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीसाठी ठेकेदाराकडून जे नदीतील पाणी आणले जाते तेच पाणी पिऊन विद्यार्थ्यांना आपली तहान भागवावी लागत होती. हा भयानक प्रकार सुरू असताना ही शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक यांच्याकडून साधा ’ भ्र ’ देखील काढला गेला नाही,असा आरोप पालकांकडून होत आहे.

- Advertisement -

बॉक्स

पिण्याच्या पाण्यासाठी ठेकेदाराकडून लाखोंची उधळपट्टी

- Advertisement -

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना प्यायला पाणी मिळावे यासाठी ठेकेदाराने लाखो रुपये खर्चून गेल्या दोन तीन वर्षांपूर्वी विहिरीतून आश्रमशाळेपर्यंत नवीन पाईप लाईन टाकली.परंतु निकृष्ट मटेरियलमुळे ही पाईप लाईन फार काळ टिकली नाही. अवघ्या काही वर्षांतच ती नादुरुस्त झाली. यामुळे याच पाईप लाईनच्या दुरुस्तीवर ठेकेदाराने पुन्हा नव्याने लाखो रुपयांचा खर्च केला. तरी देखील आजही या विद्यार्थ्यांना विहिरीतील पाणी प्यायला मिळत नाही. त्यामुळे अशा ठेकेदारावर कारवाई करावी आणि आश्रमशाळेतील पाणी पुरवठ्याची पाईप लाईन दुरुस्त करुन देण्याची मागणी चास गावातील ग्रामस्थांकडून होत आहे.

कोट

विहिरीपासून आश्रमशाळेपर्यंतची पाईप लाईन जुनी असल्याने दुरुस्ती करुन ही पाईप फुटतो.यामुळे नळपाण्याची पाईप लाईन दुरुस्त करून मिळावी यासाठी प्रकल्प कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे.”
– पी.पी.सोनावणे, प्रभारी, मुख्याध्यापक शासकीय आश्रमशाळा चास..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -