घरपालघरप्रदूषणप्रकरणी तक्रारीची जानेवारीत सुनावणी

प्रदूषणप्रकरणी तक्रारीची जानेवारीत सुनावणी

Subscribe

या प्रदूषणाबाबत तक्रारी करूनही उपाययोजना करण्यास संबंधित विभागांना अपयश येत असल्याने बोईसर येथील ’सिटिझन फोरम’ या संस्थेचे अध्यक्ष डॉ. सूर्यकांत संखे आणि सचिव डॉ. सुभाष संखे यांनी ८ मार्च २०२३ रोजी लोकायुक्त कार्यालयाकडे तक्रार केली होती.

बोईसर: बोईसर- तारापूर औद्योगिक पालघर वसाहत आणि लगतच्या आठ ग्रामपंचायत हद्दीतील घनकचरा, वायू आणि जल प्रदूषणाविरोधात एका सामाजिक संस्थेने केलेल्या तक्रारीसंदर्भात जानेवारी २०२४ मध्ये पुढील सुनावणी होणार आहे.
सुनावणी १२ जानेवारी २०२४ रोजी होणार असून, ’सिटिझन फोरम’ आणि सरकारी यंत्रणांना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. बोईसर शहर, तारापूर औद्योगिक वसाहत आणि लगतच्या सरावली, खैरापाडा, बेटेगाव, कोलवडे, कुंभवली, सालवड, पाम आणि पास्थळ या परिसरात घरगुती व औद्योगिक घनकचरा, वायू आणि जल प्रदूषण यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. नागरिकांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रदूषणाबाबत तक्रारी करूनही उपाययोजना करण्यास संबंधित विभागांना अपयश येत असल्याने बोईसर येथील ’सिटिझन फोरम’ या संस्थेचे अध्यक्ष डॉ. सूर्यकांत संखे आणि सचिव डॉ. सुभाष संखे यांनी ८ मार्च २०२३ रोजी लोकायुक्त कार्यालयाकडे तक्रार केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना नोटीस बजावून आपली बाजू लेखी स्वरूपात मांडण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर २५ ऑक्टोबर २०२३ रोजी ’सिटिझन फोरम’चे पदाधिकारी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली. या वेळी कारखान्यांकडून होणारे बेसुमार वायू व जल प्रदूषण याकडे ’सिटिझन फोरमने लोकायुक्तांचे लक्ष वेधले. तसेच रासायनिक तालुक्यातील दांडी आणि मुरबे खाडीकिनारी हजारो मासे मृत पावल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांकडून होणार्‍या जल प्रदूषणामुळे हे मासे मृत पावल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. मृत मासे आणि पाणी नमुने तपासणीसाठी नवी दिल्ली येथील प्रयोगशाळेत पाठवले . त्याचा अहवाल आल्यावरच मासे कशामुळे मृत पावले याचे ठोस कारण समजू शकेल, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी वीरेंद्र सिंग यांनी सांगितले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -