घरपालघरउष्णतेमुळे आंबा पिक धोक्यात; शेतकरी अडचणीत

उष्णतेमुळे आंबा पिक धोक्यात; शेतकरी अडचणीत

Subscribe

पालघर जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम तालुका जव्हारमध्ये बायफ संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान शिकवण्यात आले.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम तालुका जव्हारमध्ये बायफ संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान शिकवण्यात आले. विशेष करून फळझाडे लागवडीबाबत प्रोत्साहन करून येथील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला. तालुक्यात बरेच शेतकरी आंबा, काजू, पपई, मोगरा अशा प्रकारची झाडे लावून आपला आर्थिक स्तर उंचावू लागले आहेत. परंतु यंदाच्या वर्षी वातावरणातील प्रचंड उष्णतेमुळे फळांचा राजा आंबा पिकाला तडाखा बसला आहे. त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला असून कृषी विभागाने यासाठी काहीतरी उपाय योजना करावी, अशी मागणी जव्हार तालुक्यातील फळबाग लागवड धारक शेतकरी करत आहेत.

वेळोवेळी शेतकऱ्यांना माहिती देऊन कीटकनाशके व इतर फवारण्या झाडांवर करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहेत. हवामान विभागामार्फत हवामानात बदल झाल्याची नोंद घेतली जात असते. त्यानुसार कोणत्या भागात हवामान बदल होऊन पिकांचे नुकसान झाले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिले जाते. झाडावरील मोहर जळून काळा पडला आहे. तर थोड्याफार प्रमाणात झाडावर आंबे आले होते, तेही आता गळून पडत आहेत. कीडरोगाच्या प्रमाणात वाढ होऊन आंबा पिवळा होऊन गळून पडतो. आंबा पीक वाचविण्यासाठी कीटकनाशके व इतर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
– वसंत नागरे, तालुका कृषी अधिकारी, जव्हार

- Advertisement -

जव्हार तालुक्यात १०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात आंबा लागवड करण्यात आली आहे. परंतु सध्या वातावरणातील बदल हा शेतरकऱ्यांसाठी काळजीचा विषय बनू लागला आहे. परिसरात सकाळी ९ वाजल्यापासूनच कडक ऊन सुरु झाल्यानंतर दुपारपर्यंत तीव्रता अधिक वाढते. गरम हवा नंतर ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे त्याचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. आंबा हंगामाला पोषक वातावरण असताना गेल्या काही दिवासांपासून वाढलेली उष्णता आणि ढगाळ वातावरणामुळे जव्हार परिसरातील आंबा पिकांवर संकट ओढावले आहे. आलेला मोहोर गळून पडत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी जव्हार तालुका कृषी अधिकारी कार्यलयाकडून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते. शिवाय शेतकऱ्यांना नुकसानाबाबत अर्ज देखील भरून घेतले होते.

शेतकऱ्यांवर आलेले संकट पाहता, त्यावर कशी मात करावी. यासाठी कृषी अधिकारी कार्यालयातून आंबा लागवड शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर वेळोवेळी पिकांवर फवारणी करण्यासाठी माहिती दिली जाते. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. फळधारणा चांगले यावे, यासाठी औषध फवारणी केली होती. मात्र वातावरणातील बदलामुळे पीक खराब झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तालुक्यातील आंबा लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

‘पुन्हा चला नाहीतर पुढे चला’ हाच आपला मंत्र, आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -