घरपालघरव्वा ! वसईत स्वर्ग अवतरला

व्वा ! वसईत स्वर्ग अवतरला

Subscribe

त्यावेळी ओवाळणी करुन फुले उधळून भारतीय पद्धतीने संस्कृती दिंडीचे स्वागत करण्यात आले.

वसई: सामवेदी कुपारी बोलीभाषा आणि संस्कृती यांचा गौरव करण्यासाठी ’ सामवेदी ख्रिस्ती कुपारी संस्कृती मंडळाने आयोजित केलेल्या दहाव्या कुपारी संस्कृती महोत्सवाला यावेळी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पारंपरिक लाल लुगडे घातलेल्या स्रिया , लाल टोपी, धोतर घातलेले हजारो पुरुष यांनी नालासोपारा (प्), वाघोली येथील महोत्सव नगरी गजबजून गेली होती. संध्या.४:३० वा. वाघोली नाका येथून निघालेल्या भव्य संस्कृती शोभयात्रेत संस्कृती प्रेमी पारंपरिक वेशभूषा, बेलगाड्या, जुन्या संस्कृती वस्तू मिरवत बँडच्या तालावर वाजतगाजत सामील झाले होते. महोत्सव नगरीच्या प्रवेशद्वारावरील रिबीन फा. ज्यो आल्मेडा यांनी कापली. त्यावेळी ओवाळणी करुन फुले उधळून भारतीय पद्धतीने संस्कृती दिंडीचे स्वागत करण्यात आले.

महोत्सव नगरीत अवघी जुनी वसई अवतरल्याचे दिसून येत होते. सेबेस्टीन रॉड्रिग्ज यांनी उभारलेले जिवंत रहाट मॉडेल उपस्थितांची मने आकर्षून घेत होते. महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष फा. फिलीप लोपीस यांनी सामवेदी बोलीभाषा व पारंपरिक संस्कृती संवर्धन करण्यासाठी उपस्थितांना आवाहन केले. या महोत्सवाचे प्रमुख अतिथी म्हणून सि. सिसिलिया रॉड्रीग्स , फा. ज्यो आल्मेडा, जॉन्सन गोम्स, विजय फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय पाटील , उद्योजक पीटर फर्नांडिस यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी पर्यावरण क्षेत्रात केलेल्या बहुमोल कार्यासाठी मॅकेन्झी डाबरे यांचा तसेच क्रीडा क्षेत्रातील इतरही काही युवा क्रीडापटूंना मानचिन्ह व संस्कृती ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. या महोत्सवाचे मुख्य सहप्रयोजक असलेली बॅसीन कॅथॉलिक बँकचे अध्यक्ष रायन फर्नांडिस व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सिक्स्टो फरगोज , उपाध्यक्ष सायमन सवारीस यांचा गौरव करण्यात आला.

- Advertisement -

महोत्सवात कुपारी समाजाचा साहित्यिक अलंकार “पाशीहार” या महोत्सव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. फा. रॉबर्ट मच्याडो यांनी पवित्र बायबलमधील संत मार्क शुभवर्तमानाचे सामवेदी बोलीभाषेत अनुवादित केलेले पुस्तक ” बात खबारबात ” या पुस्तकाचे सहयोग संस्थेद्वारे प्रकाशन यावेळी करण्यात आले. मंचावरुन सादर झालेले संपूर्ण निवेदन व सांस्कृतिक कार्यक्रम सामवेदी बोलीभाषेत सादर झाले. महोत्सवात उत्तर वसईतील वीस महिला गटांनी रॅवाळा, दॉदाल,खपश्यो, पानमोडयो, इंदेल, वालाई भाजी आदी पारंपारिक खाद्ये यांचा खवयांनी येथेच आस्वाद घेतला. तर बालजत्रेत बालगोपालनी मनमुराद आनंद लुटला. संस्कृती मंडळाचे संस्थापक जिम रॉड्रीग्ज व मंडळाचे अध्यक्ष झकेरिया तुस्कानो यांचा संस्कृती मानचिन्ह देऊन गौरव केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनील डिमेलो व वेरोनिका लोपीस, सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुत्रसंचालक मंडळाचे कार्याध्यक्ष लुईस रिबेलो, प्रकाश डिकुन्हा, रिचर्ड तुस्कानो,रिक्सन तुस्कानो,सुनील डाबरे,चार्लस तुस्कानो, अर्नेस्ट रॉड्रीग्ज , नेस्टर डिकुन्हा ,जोनस परेरा, रिचर्ड डिमॉन्टी ,संजय डाबरे,एलीस डाबरे,जॅक्सन रॉड्रीग्ज,रेजीना आल्मेडा ,शैला घोन्साल्वीस,हेमा लोपीस, ट्रिझा परेरा, सिरिल मिनेझीस , विजय वाझ,जॉन परेरा,माल्कम परेरा,जोवीअन रुमाव या कार्यकर्त्यांनी महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -