घरपालघरविरारमधील मृत तरुणांना मुख्यमंत्र्यांकडून मदत

विरारमधील मृत तरुणांना मुख्यमंत्र्यांकडून मदत

Subscribe

यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर, जिल्हा समन्वयक नवीन दुबे व तालुका प्रमुख सुदेश चौधरी उपस्थित होते.

वसईः विरार पूर्वेकडील मनवेलपाडा येथील कारगिल नगर येथील दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून मृत तरुणांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) आमदार व जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांनी या घटनेतील मृत व जखमी तरुणांच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ही मदत जाहीर करण्यात आली. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर, जिल्हा समन्वयक नवीन दुबे व तालुका प्रमुख सुदेश चौधरी उपस्थित होते.

विरारच्या कारगिल नगर येथील बौद्धजन पंचायत समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री ९ वाजता निघालेली ही मिरवणूक साडेदहा वाजता संपली. कारगिल चौकातून मिरवणूक संपवून कार्यकर्ते घरी परतत होते. मिरवणूक वाहनावर (ट्रॉली) काही तरुण उभे होते. त्यावेळी वाहनावरील लोखंडी रॉड जवळील रोहित्राला लागला. त्या वीज प्रवाहामुळे वाहनावरील तरुण होरपळले होते. त्यातील रूपेश सुर्वे (३०) आणि सुमित सुत (२३) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले होते. जखमींवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेतील गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवली होती. मुख्यमंत्र्यांनी तातडीच्या सूचना करत आमदार रवींद्र फाटक यांना या तरुणांच्या घरी भेट देण्यास सांगितले होते. त्यानुसार आमदार रवींद्र फाटक यांनी दुर्घटनेतील तरुणांच्या घरी भेट दिली व त्यांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मृतांच्या कुटुंबियांना पाच; तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -