Maharashtra Assembly Election 2024
घरपालघरHit And Run: त्या रुग्णवाहिका चालकावर गुन्हा दाखल

Hit And Run: त्या रुग्णवाहिका चालकावर गुन्हा दाखल

Subscribe

घटना घडल्यानंतर रुग्णवाहिका चालक राकेश मढवी हा पळून जात असताना नागरिकांनी पकडून त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले. अखेर चालकावर भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हाची नोंद २१ नोव्हेंबर रोजी मांडवी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

विरार : वज्रेश्वरी रोडवर एका रुग्णवाहिकेवरील चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्यामुळे त्याने ६ वाहनांना धडक दिल्याची दुर्घटना गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजता घडली होती. यामध्ये ८० वर्षीय मासळी विक्री करणारी महिला गंभीर जखमी झाली होती. तिला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. या घटनेनंतर वाहन चालकाने पळता पाय काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याला पकडून मांडवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. घटना घडल्यानंतर रुग्णवाहिका चालक राकेश मढवी हा पळून जात असताना नागरिकांनी पकडून त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले. अखेर चालकावर भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हाची नोंद २१ नोव्हेंबर रोजी मांडवी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सदर घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार महामार्गाच्या दिशेने भरधाव वेगाने रुग्णवाहिका येत होती. यावेळी पारोळ फाटा येथे रुग्णवाहिकेने एका इको कारला धडक दिली. त्यानंतर उभ्या असलेल्या रिक्षाला धडक दिली.तसेच  मासळी विक्री करण्यासाठी बसलेल्या महिलेला धडक दिली, या धडकेत महिला गंभीर जखमी झाली आहे. पुढे आणखी ३ रिक्षांना धडक देत रुग्णवाहिका एका कारलाही धडकली. या विचित्र अपघातात सहा वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तर अपघातात जखमी झालेली जुली जॉन लिली ( वय ८०) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. सदर महिलेच्या पायाला आणि हातांना गंभीर जखम झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे काही अंतरावर मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थी उभे होते. सुदैवाने यात कोणत्याही शाळकरी मुलांना इजा झाली नाही. घडलेल्या घटनेमुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती तर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


Edited By Roshan Chinchwalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -