घरपालघरजाहिरात फलक लावण्याचे काम सफाई कर्मचार्‍यांना

जाहिरात फलक लावण्याचे काम सफाई कर्मचार्‍यांना

Subscribe

स्वच्छता मुकादम ह्याचा यात सहभाग आहे का ?. याचा तपास करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार आयुक्त दिलीप ढोले यांच्याकडे करण्यात आली आहे.

भाईंदर :- मिरा-भाईंदर पालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी फलकबाजी करण्यास मनाई असली तरी भाजपच्या माजी नगरसेविका व राजकीय पदाधिकारी नियमांचे उल्लंघन करत फलकबाजी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मिरारोडच्या पेणकर पाडा परिसरात तर थेट महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांना बेकायदा फलकबाजी करण्याचे काम देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी योग्य ती चौकशी करत संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे. मिरारोडच्या पेणकरपाडा परिसरातील भाजपच्या माजी नगरसेविका अनिता पाटील यांनी एका शौचालयावर चक्क महापालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांना बेकायदेशीर फलक लावण्यास सांगण्यात आल्याची बाब समोर आली आहे. हे फलक धोकादायक पद्धतीने लावताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सफाई कर्मचार्‍यांना कोणतीही सुविधा पुरवण्यात न आल्याने त्यांच्या सुरक्षेच्या प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. हा बेकायदा फलक दिवाळीच्या शुभेच्छा देणारा असून भाजपच्या माजी नगरसेविका अनिता पाटील , समाजसेवक निलेश पाटील, राजेश चव्हाण ह्यांचे फोटो त्यावर आहेत. हा फलक सफाई कर्मचार्‍यांना लावण्यास कोणी सांगितले ?. स्वच्छता मुकादम ह्याचा यात सहभाग आहे का ?. याचा तपास करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार आयुक्त दिलीप ढोले यांच्याकडे करण्यात आली आहे.

दरम्यान, मिरा-भाईंदरमध्ये राजकीय मंडळी व सामाजिक संघटनांकडून विविध कार्यक्रमानिमित्त चौकांमध्ये, झाडांवर व विद्युत खांबांवर फलकबाजी केली जात असल्याने विद्रुपीकरणात भर पडते. त्यामुळे काही वर्षांपूर्वी महापालिकेने शहरात जाहिरात फलक उपलब्ध करून देत त्यावर सशुल्क जाहिराती करण्यास परवानगी दिली आहे. शहरातील इतर सार्वजनिक ठिकाणी फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यानंतरही विविध कार्यक्रमानिमित्त राजकीय मंडळींना फलक लावण्यास महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात असली तरी गुन्हे दाखल करण्याकडे पाठ फिरवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -