Eco friendly bappa Competition
घर पालघर भीषण अपघात आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू

भीषण अपघात आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Subscribe

यांच्यासह त्यांची पत्नी केरु डवला (वय 40) लहान मुलगा जैविक, मुली सुवर्णा (वय.13) आणि प्राची (वय 10 वर्ष) असे एकूण पाच जण धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात जाण्यासाठी निघाले होते.

डहाणू : मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमवार 5 जून रोजी विवळवेढे गावच्या हद्दीत एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात आई आणि चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चालकासह दोन तरुणींना गंभीर जखमा झाल्या आहेत. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीवर चालक बारकू धवला (वय 45 रा.सातीवली धवलीपाडा) यांच्यासह त्यांची पत्नी केरु डवला (वय 40) लहान मुलगा जैविक(7), मुली सुवर्णा (वय.13) आणि प्राची (वय 10 वर्ष) असे एकूण पाच जण धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात जाण्यासाठी निघाले होते.

दरम्यान विवळवेढे येथील उड्डाणपुलावर संध्याकाळी 5.40 वाजताच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये केरू डवला आणि मुलगा जैविक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्राची आणि सुवर्णा दोन्ही मुलींना गंभीर जखमा झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी इतर ठिकाणी पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. चालक बारकु डवला यांनी हेल्मेट घातल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला नसून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली.  कासा पोलीस स्टेशन प्रभारी श्रीकांत शिंदे यांनी अपघात करून पळ काढणार्‍या वाहनाचा शोध सुरू केला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -