Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर पालघर जिल्ह्यात पुढील पाच दिवस उष्ण व दमट वातावरण

जिल्ह्यात पुढील पाच दिवस उष्ण व दमट वातावरण

Subscribe

त्यामुळे पुढील चार- पाच दिवस जिल्ह्यातील वातावरण उष्ण व दमट राहणार असल्याची माहिती कृषि विज्ञान केंद्र, जिल्हा कृषि हवामान केंद्र, कोसबाड हिल येथील कृषि हवामान तज्ञ रिझवाना सय्यद यांच्याकडून देण्यात आली आहे.

 पालघर : प्रादेशिक हवामान विभाग मुंबई द्वारे प्रसारित केलेल्या हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात पुढील पाच दिवस किमान व कमाल तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील सरासरी कमाल तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तसेच पुढील पाच दिवस सकाळच्या आर्द्रतेत वाढ होवून सरासरी आर्द्रता ८३ ते ८४ टक्के राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार- पाच दिवस जिल्ह्यातील वातावरण उष्ण व दमट राहणार असल्याची माहिती कृषि विज्ञान केंद्र, जिल्हा कृषि हवामान केंद्र, कोसबाड हिल येथील कृषि हवामान तज्ञ रिझवाना सय्यद यांच्याकडून देण्यात आली आहे.
उष्णतेत वाढ होणार असल्याने शेतकर्‍यांनी दुपारी उन्हात किंवा गरम वातावरणात श्रमाचे, अंगमेहनतीचे काम करणे टाळावे, उन्हात काम करावे लागलेच, तर पूर्ण झाकणारे पांढरे किंवा फिकट रंगाचे सुती कपडे घालून काम करावे. कपडे गळाबंद असू नयेत, हवा खेळती राहील असे सैलसर असावे. शेतीच्या कामाला शक्यतो सकाळी लवकर सुरुवात करून दुपारी विश्रांती घ्यावी. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी रोपवाटिका, भाजीपाला व फळ बागांना गरजेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी, त्यासाठी ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. पिकांना शक्यतो संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळी पाणी द्यावे. जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी जनावरांना आहारामध्ये हिरव्या चार्‍याचा समावेश करावा, जेणेकरून शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढून तापमान योग्य ठेवण्यास मदत होईल. जनावरांना पिण्यासाठी थंड पाणी उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी पाण्यामध्ये बर्फाचा वापर करावा. तसेच जनावरांना ग्लुकोज पावडर व गूळ मिश्रित पाणी द्यावे. जनावरांना २४ तास पाणी उपलब्ध करून द्यावे किंवा पाणी देण्याच्या वेळा वाढवाव्यात. दुपारच्या वेळी किंवा भर उन्हात जनावरांना चरण्यासाठी सोडू नये. वाळलेला चारा आणि खुराक शक्यतो सकाळी व संध्याकाळच्या वेळी द्यावा, असा सल्ला कृषि विज्ञान केंद्र कोसबाडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांच्याकडून देण्यात आला आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -