घर पालघर विरारमध्ये अजून एक अनधिकृत इमारत घोटाळा

विरारमध्ये अजून एक अनधिकृत इमारत घोटाळा

Subscribe

याआधीही विरार पोलीस ठाण्यात फसवणुकीचे तसेच विविध कलमानुसार गुन्हे दाखल आहेत. त्यातच आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने अमित राणे यांच्या अडचणी वाढणार आहेत.

वसईः विरार पूर्वेकडील मनवेलपाडा परिसरात बनावट कागदपत्रांच्या आधारे सात बहुमजली इमारतींचे गृहसंकुल उभारल्याप्रकरणी विरारमधील शिवसेनेच्या एका नेत्याच्या कार्यालयातील निकटवर्तीय अमित राणेसह ८ बिल्डर आणि त्यांच्या इतर साथीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. सध्या अमित राणे हा अज्ञातवासात आहे. अमित राणे यांच्याविरोधात याआधीही विरार पोलीस ठाण्यात फसवणुकीचे तसेच विविध कलमानुसार गुन्हे दाखल आहेत. त्यातच आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने अमित राणे यांच्या अडचणी वाढणार आहेत.

विरार पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदारी सुरेंद्र शिवदे यांनी वसईतील बोगस कागदत्रांच्या आधारे अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या असल्याचे उजेडात आणल्यानंतर आता वसई- विरार परिसरातील अशी अनेक प्रकरणे उजेडात येऊ लागली आहेत. प्रभाग समिती ब चे सहाय्यक आयुक्त सुरेश हरेश्वर पाटील यांनी विरार पोलीस ठाण्यात ४२०,४६५,४६७,४६८,४७१,४७४,३४ सह एम.आर.टी.पी कायदा कलम ५२,५३,५४ सह महाराष्ट्र ओनरशिप ऑफ अ‍ॅक्ट सन १९६३ चे कलम ३,४,१३ सह नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ५२ प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल केला आहे. बनावट,खोटी बांधकाम परवानगी वापरून ७ इमारतींचे अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच सदरच्या इमारती अधिकृत असल्याचे भासवून वसई- विरार महापालिकेच्या प्रभाग समिती ब अंतर्गत येणार्‍या मनवेलपाडा परिसरात मौजे विरार सर्व्हे नंबर २२६ हिस्सा नं. ४ पैकी या जमीनीवर विकासकानी बनावट बांधकाम परवानगीच्या आधारे ४ मजली ७ इमारतीचे बांधकाम केलेले असल्याबाबतची तक्रार दाखल केली होती.

- Advertisement -

गुन्हा दाखल झालेल्या विकासकांनी श्री सिध्दी -१, श्री सिध्दी -२ , श्री सिध्दी -३, शिवसाई संकुल ए विंग, शिवसाई संकुल बी विंग, शिवसाई संकुल सी विंग, सद्गुरू अपार्टमेंट या इमारती कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधल्याचे उजेडात आल्यानंतर संबंधित विकासकांना प्रभाग समिती ब च्या सहाय्यक आयुक्तांनी २९/०८/२०२३ रोजी एमआरटीपी कायद्यान्वये नोटीस बजावली होती. सदर नोटीसचे अनुपालन विकासकांनी न केल्याने प्रभाग समिती बच्या सहाय्यक आयुक्तांनी नगररचना विभागाकडे बांधकाम परवानगीबाबत पत्रव्यवहार केला असता उपसंचालक, नगररचना विभाग यांनी मौजे २२६ हिस्सा क्रमांक ४ या मिळकतीवर कुठलीही बांधकाम परवानगी दिल्याचे दिसून येत नाही असे कळवले होते. त्याव्यतिरीक्त बांधकाम केले असल्यास योग्य ती कार्यवाही करण्याबाबतचे आदेश जारी केले होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणीकृत करून देऊन महापालिकेची, वित्तीय संस्थांची व ग्राहकांचीही फसवणूक केल्याची बाब महापालिका अधिकार्‍यांच्या निदर्शनास येताच बिल्डरांविरोधात महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बॉक्स

- Advertisement -

गुन्हे दाखल झालेल्या विकासकांची नावे-१)मे.सिध्दी बिल्डर्स- अमित राणे, अशोक पाटील २) मे.शुभम बिल्डर्स- अजित वर्तक,मिलिंद चेंदवणकर ३) मे.सदगुरू कंन्स्ट्रक्शन- धोंडु तुकाराम चव्हाण,सुधाकर महादेव चौधरी ४) मे.साई समर्थ बिल्डर्स- मनोज राऊत,सतिश शिंगारे

- Advertisment -