घरपालघरआमचे पोट हातावर, त्यात ही महागाई बसली उरावर !

आमचे पोट हातावर, त्यात ही महागाई बसली उरावर !

Subscribe

या सर्व मार्गाने मिळत असलेली मजुरी ही तोकडी पडत असल्याने वाढत्या महागाईत हातावर आणून पानावर खाणार्‍यांचे हाल होत आहेत.

जव्हार : ग्रामीण भागात आधीच रोजगाराची वानवा आहे,त्यात काम मिळाले जरी तरी, रोजच्या मिळणार्‍या मजुरीतून आपला संसार चालविणार्‍या मजुरांची अवस्था सध्या वाईट झाली आहे. सतत वाढणारी महागाई व मिळणारी रोजंदारी २०० रुपये यात घर चालविणे, मुलाबाळांचे शिक्षण, आरोग्य एकूणच त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह कठीण होत चालला आहे.रोजंदारीचे काम केल्यानंतर बर्‍याचदा मिळणारी रोजंदारी ही बँक खात्यावर जमा करण्यात येत असते, खर्चाला पैसे काढण्यासाठी , मिळेल त्या वाहनाने भाडे खर्च करून जव्हार शहराकडे धाव घ्यावी लागते. बँकेत ग्राहकांची रांग मोठी असते, जवळपास दोन ते तीन तासानंतर पैसे मिळत आहेत ,त्यामुळे पैसे काढण्यासाठी आल्यानंतर दिवसभराची मजुरी देखील बुडत आहे.त्यामुळे रुग्णालयाचा आणि पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च करायचे झाल्यास ,मजुरांची अवस्था अतिशय बिकट होत आहे. जव्हारसारख्या आदिवासी आणि ग्रामीण भागात शेतमजुरी, गवंड्याच्या हाताखाली मजुरी आणि रोजगार हमी योजनेतून मिळणारे काम या सर्व मार्गाने मिळत असलेली मजुरी ही तोकडी पडत असल्याने वाढत्या महागाईत हातावर आणून पानावर खाणार्‍यांचे हाल होत आहेत.

तालुक्यात अकुशल मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस महागाईमुळे गंभीर होत चालला आहे. मजुराचा पाल्य शिक्षण घेण्याच्या वयात आपल्या आई-वडिलांना घर चालविण्याकरिता शिक्षण सोडून मिळेल ते काम करत आहे. काम मिळविण्याच्या लालसेत तो अवैध मार्गाकडेही वळू लागला आहे. त्यामुळे मुलांमध्ये आतापासूनच गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
– सारीका गावडे, सामाजिक कार्यकर्त्या

- Advertisement -

मी देहेरा गावात राहात असून, मजुरीची कामे करतो. मला 300 रुपये रोज मिळते. घरामध्ये आम्ही 6 लोक आहोत. मुला-मुलींना कसेबसे शिक्षण देत आहोत. पण आता तीनशे रुपये रोजीमध्ये घर चालविणे कठीण झाले आहे.
– रविदास चौधरी, खंडीपाडा,मजूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -