घरपालघरअधिकाराची माहिती कशी मिळणार साहेब ?

अधिकाराची माहिती कशी मिळणार साहेब ?

Subscribe

त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होत आहे.

जव्हार: पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भाग असलेल्या जव्हार तालुक्यात आजही शिक्षणाच्या अपुर्‍या सोयी, आरोग्य व्यवस्थेच्या अपुर्‍या यंत्रसामुग्री, खरीप हंगामातील शेती, रोजगारांच्या अल्प संधी आहेत. असे असताना तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे समजल्या जाणार्‍या जव्हार तहसील कार्यालयाने नागरिकांच्या हिताचा माहिती अधिकार फलक चक्क लावला नसल्याचे समोर आले आहे. जव्हार शहरातील किंवा ग्रामीण भागातील नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यापासून ते रेशन कार्ड, शालोपयोगी विविध दाखले, नागरिकत्वाची ओळख असणारे मतदान कार्ड ,इतर योजनांसंदर्भात तहसील कार्यालयात यावे लागते. मात्र या ठिकाणी तहसील कार्यालय परिसरात किंवा अधिकार्‍यांच्या दालनाच्या बाहेर कुठेही माहितीच्या अधिकारात कोणाकडे कसा अर्ज करावा, याचा फलकच लावण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होत आहे.
माहितीच्या अधिकारात कोणाकडे कशी माहिती मागवावी यासंदर्भातील बोर्ड तहसील कार्यालयात आजपर्यंत लावण्यात आलेला नाही. याकडे कोणीच अधिकारी लक्ष देण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.त्यामुळे जनजागृती कशी होईल, हा प्रश्न आहे.

माहिती अधिकार नवीन फलक बनवायला टाकलेला आहे. बुधवार संध्याकाळ पर्यंत फलक लावण्यासाठी सूचना केली आहे.
आशा तामखडे, तहसीलदार,जव्हार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -