Maharashtra Assembly Election 2024
घरपालघरवाढवण बंदरामुळे मानव जातीवर सुध्दा परिणाम होणार

वाढवण बंदरामुळे मानव जातीवर सुध्दा परिणाम होणार

Subscribe

धरणात पुरेसा पाणी नसल्याचे कारण पुढे ढकलले जातो. परंतु, या वाढवण बंदरासाठी येथील स्थानिक रहिवाशी तहानलेला असताना थेट कवडासवरून पाण्याची पाईपलाईन टाकली जाणार आहे.

पालघर: वाढवण बंदर जरी समुद्रात बांधले जाणार असले तरी पण त्याच्या संरक्षणासाठी जी वॉटर ब्रेकिंग वॉल बांधली जाणार आहे, ती दहा किलोमीटर लांबीची असणार आहे. तसेच ही भिंत बंदराच्या दोन्ही बाजूला बांधली जाणार आहे. त्यामुळे समुद्राच्या लाटांच्या नैसर्गिक प्रवाह अडला जाईल. ज्या कारणाने मॉन्सूनवर याच्या परिणाम होईल. मॉन्सूनवर परिणाम होणार म्हणजे सम्पूर्ण मानव जातीवर सुध्दा याच्या परिणाम होणार, असे मत वाढवण बंदर संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी व्यक्त केले. ते जागतिक मच्छिमार दिनानिमित्त पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित एका जाहीर सभेत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, या बंदरासाठी दररोज १३ लाख लिटर पाणी बंदराच्या ठिकाणी आणि ८ लाख लिटर पाणी दररोज त्यांची या भागात होणारी जी वसाहत आहे, तिथे लागणार आहे. हा पाणी पुरवठा सूर्या धरणातून होणार आहे. पण १९७४ पासून येथील पश्चिम किनारपट्टीवरीलरहिवाशी तहानलेला आहे. येथील रहिवाश्यांनी सूर्या धरणातील पाण्याची मागणी केल्यास ती सातत्याने फेटाळली जाते. धरणात पुरेसा पाणी नसल्याचे कारण पुढे ढकलले जातो. परंतु, या वाढवण बंदरासाठी येथील स्थानिक रहिवाशी तहानलेला असताना थेट कवडासवरून पाण्याची पाईपलाईन टाकली जाणार आहे.

मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी पालघर येथे जागतिक मच्छिमार दिनाच्या निमित्ताने वाढवण येथे होणार्‍या वाढवण बंदर रद्द साठी व इतर मागण्यांसाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या सभेचे आयोजन नॅशनल फिशवर्कर्स फोरम (एनएफएफ), महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती(एमएमकेएस), ठाणे जिल्हा मच्छिमार मध्यवर्ती सहकारी संघ मर्यादित, ठाणे जिल्हा मच्छिमार समाज संघ व वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती इत्यादींच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी या सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सभेदरम्यान वाढवण बंदर कायमचे रद्द करणे, मच्छिमारांच्या घराखालील आणि वापरात असलेल्या जमिनीचे ७ /१२ उतारे मच्छिमारांच्या नावे करावेत, सरकारने मच्छिमारांना समुद्र आणि समुद्र किनार्‍यावरील हक्क देणारा सागरी किनारा कायदा करावा या व अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. याबाबत पालघर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन ही देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -