घरपालघरचिल्हार- बोईसर रस्त्यालगतच्या शेकडो झाडांची कत्तल

चिल्हार- बोईसर रस्त्यालगतच्या शेकडो झाडांची कत्तल

Subscribe

रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली या मार्गावर कित्येक वर्षापासून उभे असलेल्या चारशे ते साडेचारशे छोट्या-मोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे.

बोईसर येथील चिल्हार-बोईसर या मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली या मार्गावर कित्येक वर्षापासून उभे असलेल्या चारशे ते साडेचारशे छोट्या-मोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. एका झाडाच्या ऐवजी पाच झाडे लावण्याचे कंपनीकडून अनुबंध करण्यात आले आहे. मात्र याचा विसर कंत्रादारांना पडल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. आधीच जिल्ह्यातील जंगलात सतत लागणार्‍या आगीमुळे वृक्षाचे प्रमाण कमी होत असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललेला आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून जिल्ह्याला लहरी पावसाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घासही पावसाच्या पुरात वाहून जात आहे.

तर दुसर्‍या बाजूने ज्या कारणास्तव बोईसर, तारापूर एमआयडीसीच्या अवजड वाहनांना तसेच होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हे रुंदीकरण करण्यात आले आहे. त्या एमआयडीसीने देखील प्रदुषणाचा कळस गाठला आहे. असे असतानासुद्धा रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली शेकडो हेक्टर जमीन संपादित करून त्यावरील मोठे वृक्ष तोडण्यात येत असल्याने हरित पट्ट्यांनी भरलेला हा परिसर भकास करण्याचे कार्य संबंधित विभागाकडूनच केले जात आहे. एकीकडे शासन वृक्ष अभियान राबवून वृक्षलागवड करावी, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून जनजागृती करते. तर दुसरीकडे उभ्या असलेल्या मोठ्या वृक्षाची कत्तल करण्यात येत आहे.

- Advertisement -

यामुळे शासनाचा दुटप्पीपणा दिसून येत असल्याने पर्यावरण प्रेमीतून तीव्र नाराजीचा सूर आहे. राज्य सरकार एकीकडे ’झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देत आहे. तर दुसरीकडे मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात महाकाय वृक्ष तोडण्याचे काम सुरू आहे. पर्यावरणाचा विचार करता या मार्गावरील वृक्षांची कत्तल न करता महाकाय वृक्षाचे संगोपन करण्याची मागणी पर्यावरण प्रेमीसह परिसरातील नागरिकातून कित्येकदा केली गेली आहे. मात्र त्यांच्या मागणीकडे अर्थकारणात बुडालेल्या अधिकार्‍यांना वेळच मिळत नाही. हेच वास्तव बोईसर-चिल्हार रस्त्यावर पाहावयास मिळत आहे.

बोईसर, चिल्हार मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम गेल्या तीन-चार वर्षांपासून सुरू असून ते आता अंतिम टप्प्यात आहे. सुरुवातीला कंत्राटदाराकडून झाडे लावण्याचा देखावा केला गेला. मात्र त्यामधील झाडांचे संवर्धन न केल्याने आज एकही झाड जिवंत उरले नाही. खर्‍या अर्थाने आपला स्वार्थ साधण्यासाठी रस्त्यांचे काम करताना कंत्राटदार अधिकार्‍यांना नाना वचने देतात. मात्र काम उरकताच येरे माझ्या मागल्या अशीच स्थिती असते. तर या सगळ्या घटनेत अगोदरच टेबलाखालून झालेल्या व्यवहारात झाडे मात्र आपल्या जीवाला मुकलेली आणि सुकलेली दिसत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – 

राज ठाकरेंची पुढच्या आठवड्यात पुण्यात सभा, उद्या 12 वाजता करणार घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -