घरपालघरचक्रीवादळाला मच्छिमारांना तडाखा; अर्नाळा, अर्नाळा किल्ल्यातील बोटींचे नुकसान

चक्रीवादळाला मच्छिमारांना तडाखा; अर्नाळा, अर्नाळा किल्ल्यातील बोटींचे नुकसान

Subscribe

सोमवारी आलेल्या चक्रीवादळाने अर्नाळा आणि अर्नाळा किल्ल्यातील तब्बल १५ मासेमारी बोटींचे नुकसान झाले आहे. या बोटी पालघर तालुक्यातील दातिवरे, एडवण परिसरात भरकटून दगडावर आपटून फुटल्या आहेत.

सोमवारी आलेल्या चक्रीवादळाने अर्नाळा आणि अर्नाळा किल्ल्यातील तब्बल १५ मासेमारी बोटींचे नुकसान झाले आहे. या बोटी पालघर तालुक्यातील दातिवरे, एडवण परिसरात भरकटून दगडावर आपटून फुटल्या आहेत. सोमवारच्या चक्रीवादळाच्या नुकसानीची माहिती आता हळूहळू उजेडात येऊ लागली आहे. अर्नाळा समुद्रकिनारी नांगरून ठेवलेल्या चार मोठ्या मच्छिमार बोटी वादळवारा आणि समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने दोर तोडून भरकटल्या होत्या. त्या बोटी पालघर तालुक्यातील दातिवरे, एडवण समुद्रकिनारी आढळून आल्या आहेत. किनाऱ्यावरील दगडावर आपटून या बोटी फुटल्याने मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे.

अर्नाळा कोळीवाड्यातील सुरेश पांडुली यांची भोलाशंकर ही मोठी मासेमारी बोट दगडावर आपटून फुटल्याने ती पूर्णपणे कामातून गेली आहे. त्यामुळे पांडुली यांचे किमान चाळीस लाख रुपयांच्या आसपास नुकसान झाले आहे. कोळीवाड्यातील जॉनसन डेडू यांची मोशे आणि रमेश जांगुल यांच्या धनवान बोटीचाही चुराडा झाला आहे. त्यामुळे दोन्ही बोट मालकांना प्रत्येकी चाळीस लाखांचा फटका बसला आहे. तर गजानन बोरीखालचा यांच्या दिगंबर बोटीचे साठ टक्के नुकसान झाले असून त्यांना वीस लाखांच्या आसपास फटका बसला आहे.

- Advertisement -

अर्नाळा किल्ल्यातील किमान अकरा बोटी फुटल्या आहेत. समुद्रात बांधलेल्या या बोटी वादळवारा आणि लाटांच्या तडाख्याने दोरखंड तोडून समुद्रात भरकटल्या होत्या. त्याही दातिवरे, एडवण समुद्रकिनारी आढळून आल्या असून त्यांही पूर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे मच्छिमारांचे प्रत्येकी दहा लाखांचा फटका बसला आहे. तर अर्नाळा किल्ल्यातीलच काही फायबर बोटींना जलसमाधी मिळाली आहे.

दरम्यान, अर्नाळा किल्ला गावाचे सरपंच चंद्रकांत मेहेर यांनी या नुकसानीची तक्रार महसूल खात्याकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नुकसानग्रस्त बोटींची पाहणी करून पंचनामा केल्यानंतर तसा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांमार्फत पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून बोट मालकांना नुकसान भरपाई दिली जाईल, असे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा –

DRDO च्या DIPCOVAN किटने तपासता येणार अँटीबॉडी, केंद्राने दिली मंजूरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -