घरपालघरमी तुझ्या मुलीला संपवले ! नालासोपार्‍यात लिव्ह इन मर्डर

मी तुझ्या मुलीला संपवले ! नालासोपार्‍यात लिव्ह इन मर्डर

Subscribe

आईने इस्टेट एजंट संजीव ठाकूर यांच्याशी संपर्क साधून खातरजमा केल्यानंतर मेघाचा खून झाल्याचे उजेडात आले.

वसईः श्रद्धा वालकर, निक्की यादव हे लिव्ह इन हत्या प्रकरण देशात चर्चेत असतानाच अशीच भयंकर घटना नालासोपारा भागात घडली आहे. एका 28 वर्षीय आरोपीने त्याच्या 40 वर्षीय लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. हत्या उघड होऊ नये म्हणून आरोपीने लिव्ह इन पार्टनरचा मृतदेह बेडमध्ये लपवला होता. नालासोपारा पुर्वेकडील तुळींज रोडवरील जिल्हा परिषद शाळेजवळील सीता सदन इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये वीस दिवसांपूपर्वी हार्दिक राजुभाई शाह (२८) आणि त्याची पत्नी मेघा हार्दीक शाह उर्फ मेघा धनसिंग तोरवी (४०) हे दोघे भाडेकरू म्हणून रहायवास आले होते. सोमवारी संध्याकाळी शाह यांच्या बंद घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजार्‍यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला तेव्हा मेघा शाह हिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हार्दिकने मेघाच्या आईला तुझ्या मुलीला संपवल्याचा मेसेजही पाठवला होता. आईने इस्टेट एजंट संजीव ठाकूर यांच्याशी संपर्क साधून खातरजमा केल्यानंतर मेघाचा खून झाल्याचे उजेडात आले.

असा पकडला आरोपी

- Advertisement -

मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे गुन्हे शाखा दोनचे प्रमुख पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे यांनी याप्रकरणी तपास करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली होती. तांत्रिक आणि माहितगारांकडून मिळालेल्या माहितीवरून रणवरे यांना हार्दिक पश्चिम एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर रणवरे यांनी मध्य प्रदेशमधील नागदा रेल्वे पोलीस बलाशी समन्वय साधून हार्दिकची माहिती दिली. रेल्वे पोलीस बलाने हार्दिकला नागदा रेल्वे स्टेशनवर पश्चिम एक्सप्रेस ट्रेनमधून ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हे शाखा दोनच्या पथकाने त्याठिकाणी जाऊन हार्दिकचा ताबा घेऊन वसईत आणले.

हार्दिक होता बेरोजगार

- Advertisement -

हार्दिक शाह काहीही काम करायचा नाही, तर मेघा तोरवी नर्स म्हणून काम करायची. तिच्या पगारावर दोघेही राहायचे. हार्दिक काम करत नसल्याने दोघांमध्ये वाद सुरु झाले. सततच्या वादाचा राग येऊन हार्दिक शाहने मेघाची हत्याच केली. हार्दिकने गळा आवळून मेघाला संपवले. लिव्ह इन पार्टनर मेघा पूर्वीची हत्या केल्यानंतर हार्दिक शाहने घरातील सर्व सामान विकून टाकले. हत्या केल्याचे कुणाला कळू नये म्हणून त्याने मेघाचा मृतदेह बेडमध्ये लपवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -