घरपालघरशाळेच्या निष्काळजीपणामुळे माझी मुलगी मी गमावली

शाळेच्या निष्काळजीपणामुळे माझी मुलगी मी गमावली

Subscribe

मात्र शाळेचा निष्काळजीपणामुळे आज माझी मुलगी मी गमावली आहे, असेही वडिलांकडून आणि नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे.

डहाणू: डहाणू वाणगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा साखरे या शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणारी मुलगी हिचा अल्पशा आजाराने मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा आश्रम शाळेतील शिक्षण व्यवस्था आणि उपचारासाठी दाखल केलेल्या आरोग्य केंद्रावर संशय व्यक्त केला जात आहे. मयत विद्यार्थिनी ही धानिवरी येथील असून तिचे नाव आचल नवसू भेस्कर ( वय वर्षे १६) होते. मयत आचल भेस्कर ही विद्यार्थिनी शाळेत गेल्या तीन दिवसांपासून आजारी असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले . त्यानंतर ती अचानक बेशुद्ध पडली, तेव्हा शाळेतील अधीक्षिका आणि कर्मचारी यांनी वडिलांना कळविले. त्यानंतर तिला ग्रामीण रुग्णालयात उपचारकरीता दाखल केले होते. मयत विद्यार्थिनीला वेळेत रुग्णालयात नेले असते तर कदाचित आज ती जिवंत राहिली असती. मात्र शाळेचा निष्काळजीपणामुळे आज माझी मुलगी मी गमावली आहे, असेही वडिलांकडून आणि नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे.

आचल ही आजारी असल्याचे मोबाईलद्वारे तिच्या वडिलांना कळवल्यानंतर तिचे वडील नवसू भेस्कर हे शाळेत पोहचले होते. त्यानंतर तिला वाणगाव येथील सरकारी आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करतेवेळी शाळेतील अधीक्षका प्रियांका पाटील आणि तेथील कर्मचारी आणि सोबत वडील उपस्थित होते. डॉक्टरांच्या प्राथमिक उपचारानंतर तिच्या काही रक्ताचे नमुने घेऊन चाचण्या करण्यात आल्या. त्यावेळेस त्या चाचणीत तिला सिकलसेल हा आजार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिला औषध उपचार करत तिला धानोरी येथील तिच्या घरी नेण्यास सांगितले. धानिवरी खडकी पाडा येथे गेल्यानंतर तिला रात्री त्रास व्हायला लागला .त्यानंतर दुसर्‍या दिवशी दुपारच्या वेळेस सुमारे १.३० ते २.०० वाजेच्य दरम्यान ती मृत्युमुखी पडल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. त्यानंतर गावातील नातेवाईक , ग्रामस्थांनी आणि तिच्या वडिलांनी गुरुवारी 9 च्या दरम्यान तिचा मृतदेह कासा येथील उप जिल्हा रूग्णालयात पाठवला. कासा पोलीस ठाण्यात सदर घटनेची माहिती दिली असता त्यांनी नोंद करत पुढील कार्यवाही सुरू केली. त्यानंतर कासा उप जिल्हा रूग्णालयात तिच्या शव विच्छेदनाकरीत तिचा मृतदेह 10 रोजी पालकांच्या स्वाधीन केला.

- Advertisement -

सदर मुलगी आजारी असल्याने आम्ही तिला 8 तारखेला वानगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर तिच्या वडिलांना बोलावून डॉक्टरांच्या सल्ल्याने तिच्या वडिलांच्या ताब्यात दिले.

– प्रियांका पाटील , अधीक्षिका साखरे आश्रम शाळा.

- Advertisement -

मी वीट भट्टीवर कामानिमित्ताने वापी येथे गेलो होतो. मला फोन द्वारे एकाने निरोप दिल्यावर मी शाळेत गेलो असता माझी मुलगी बेशुद्ध अवस्थेत गाडीत होती. त्यानंतर वानगाव येथील रुग्णालयात उपचार करीता नेण्यात आले. पण तिला अजूनही पुढच्या उपचारासाठी पुढील रुग्णालयात पाठवायला पाहिजे होती. तर ती वाचली असती.असे काही न करता निष्काळजीपणा केला आहे. त्यामुळे या बाबतीत पुढील चौकशी करावी.

– नवसू भेस्कर , पालक.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -