घरपालघरपावसासाठी नाही तर शेतकरी कायमस्वरूपी अधिकार्याच्या प्रतिक्षेत

पावसासाठी नाही तर शेतकरी कायमस्वरूपी अधिकार्याच्या प्रतिक्षेत

Subscribe

आता या जागेचा पदभार सांभाळणार्‍या वाडा तालुका कृषी अधिकारी यांचीही बदली झाल्याने सध्या ही जागा रिक्त झाली आहे.

वाडा:  उपविभागीय कृषी अधिकार्‍यासह वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या सर्वच तालुक्यात तालुका कृषी अधिकारी प्रभारी असल्याने ऐन खरिप हंगामाच्या तोंडावर शेतकर्‍यांच्या विविध कामांना खीळ बसली आहे. वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा या चार तालुक्यांचे उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय वाडा येथे आहे. येथील तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद जाधव हे मार्च 2022 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी पालघर जिल्हा अधीक्षक कार्यालयातील नरेंद्र आघाव यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला. तेही चार महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. आता या जागेचा पदभार सांभाळणार्‍या वाडा तालुका कृषी अधिकारी यांचीही बदली झाल्याने सध्या ही जागा रिक्त झाली आहे.

जव्हार, मोखाडा या दोन्ही तालुक्यांमध्ये गेले अनेक महिने तालुका कृषी अधिकारी हे पद रिक्त असून या ठिकाणी प्रभारी कारभार सुरू आहे. तर विक्रमगड येथील तालुका कृषी अधिकार्‍यांची नुकतीच बदली झाली आहे. वाडा तालुका कृषी अधिकारी शिल्पा निखाडे यांची पदोन्नती झाली आहे. चौकट योजना ठप्प, शेतकरी थंड कृषी विभागाच्या शेतकर्‍यांसाठी शंभरहून अधिक योजना आहेत. 25 ते 50 टक्के अनुदान असलेल्या या योजनांपैकी निम्म्याही योजनांची माहिती येथील शेतकर्‍यांना नाही. किंबहुना या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जात नाही. येथील शेतकरीही शेती उत्पादनांबाबत निरुत्साही झाल्याने या योजनांची माहिती करुन घेण्यास व त्याचा लाभ घेण्यासाठी पुढे येत नाहीत. शेतकरी थंड झाल्याने योजनाही ठप्प झाल्या आहेत. कोट विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शेतकर्‍यांना शासनाच्या विविध अटी व शर्तींचा सामना करावा लागतो. -एकनाथ वेखंडे – शेतकरी, न्याहळपाडा (कांबारे), ता. वाडा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -