घरपालघरआरक्षणाच्या विरोधात बोलणारा आला तर....

आरक्षणाच्या विरोधात बोलणारा आला तर….

Subscribe

सकल मराठा समाजाचे समन्वयक सुभाष काशिद यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली त्या वेळी जरांगे पाटील बोलत होते.

भाईंदर :- आपण कोणाचे घेत नाही पण हक्काचे आहे ते मिळालेच पाहिजे, आम्ही सुसंस्कृत म्हणून संयम पाळला आहे. पण आरक्षणाच्या विरोधात बोलणारा आला तर तो वारलाच समजा, असा इशारा मीरा रोड येथील सभेत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मीरा- रोड येथील काशीमीरा भागातील जरीमरी तलावाजवळ श्रीक्षेत्र नारायणगड सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ कार्यक्रमाला भेट देऊन, सकल मराठा समाजाचे समन्वयक सुभाष काशिद यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली त्या वेळी जरांगे पाटील बोलत होते.

ते पुढे म्हणाले, मराठा समाजाचा लढा अंतिम टप्प्यात आला आहे. आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाले. लावालावीचे प्रयत्न झाले, पण लढाई शांततेत केली. अन्यथा ती सरकारला पेलवणारी नव्हती. आरक्षणाच्या विरोधात बोलणारा आला तर तो वारलाच समजा असा इशारा दिला. तसेच घरा घरातील लेकरांचे कल्याण करण्यासाठी समाजाने एकजूट ठेवावी असे त्यांनी आवाहन केले. तत्पूर्वी मीरा- भाईंदर शहराच्या प्रवेशद्वाराजवळील वरसावेपासून काशीमीरापर्यंत मोटारसायकल रॅली काढून जरांगे पाटिल यांचे स्वागत केले गेले. रॅलीसह जात जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. ठिकठिकाणी १० जेसीबीच्या सहाय्याने जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. कार्यक्रमाला मीरा- भाईंदर शहरातील मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -