डहाणूमध्ये बेकायदा गोमांस जप्त

काल मकर संक्रातीच्या दिवशी संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास डहाणूतील हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाळत ठेवून सापळा रचत डहाणू हरजीपाडा येथे रेल्वे पुलाचे काम करणार्‍या बिहारी कामगारांकडून २.५ किलो गोमांस हस्तगत करून त्यांना डहाणू पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

कुणाल लाडे, डहाणू : डहाणूमध्ये बेकायदा गोमांस विक्री प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून यातील एक मुख्य आरोपी मात्र फरार झाला आहे.या घटनेत आरोपींकडून २.५ किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्यान्वये गोवंश हत्या आणि गोमांस वाहतूक व विक्री प्रतिबंधित करण्यात आली आहे.काल मकर संक्रातीच्या दिवशी संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास डहाणूतील हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाळत ठेवून सापळा रचत डहाणू हरजीपाडा येथे रेल्वे पुलाचे काम करणार्‍या बिहारी कामगारांकडून २.५ किलो गोमांस हस्तगत करून त्यांना डहाणू पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

बेकायदा गोमांस विक्रीप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद जाबीर मोहम्मद घरू शेख आणि मोहम्मद मुश्रफ आलम या दोन बिहारी कामगारांना ताब्यात घेत प्राणी संरक्षण कायदा १९७६ अंतर्गत भा.दं.वि.कलम ५ क,९ अ अन्वये अटक करण्यात आली असून आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.तर आरोपींना गोमांस पुरवठा करणारा फैय्याज हा प्रमुख संशयीत आरोपी मात्र कारवाईचा सुगावा लागताच फरार झाला आहे.डहाणूच्या पशू वैद्यकीय अधिकार्‍यानी गोमांसाचे नमुने ताब्यात घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. पालघर जिल्ह्यातील तारापूर,चिंचणी,वाणगाव आणि डहाणू या परिसरात सातत्याने गोवंश हत्येच्या घटना घडत आहेत.
या भागातील शेतकर्‍यांच्या बाहेर चरण्यासाठी गेलेल्या गुरांना पकडून त्यांना बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देत तस्करी केली जाते.त्याचप्रमाणे काही ठिकाणी गुप्तपणे गोवंश कत्तल करण्याच्या घटना उघडकीस आल्या असून त्यात सामील आरोपींवर पोलिसांकडून कारवाई होऊन देखील गोवंश चोरी आणि हत्या होत आहेत.