घर पालघर रेती माफियांचे अवैध धंदे पाण्यात बुडविले

रेती माफियांचे अवैध धंदे पाण्यात बुडविले

Subscribe

तसा अहवाल अपर तहसीलदार कार्यालय मीरा- भाईंदर पाठवण्यात आला आहे. या अवैध तस्करीची तक्रार समाजसेवक वसंत माने, संजय मकवाना व गणेश दिघे यांनी केली होती.

भाईंदर :- शासनाचा महसूल बुडवून घोडबंदरच्या खाडीत अवैधरित्या सक्शन पंपच्या साहाय्याने रेती उत्खनन करून त्याची चोरट्या मार्गाने विक्री करणार्‍या रेती माफियांना अपर तहसीलदार निलेश गौंड यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी धक्का दिला आहे. अवैध रेती साठे उद्ध्वस्त करत रेती पुन्हा जेसीबीच्या साहाय्याने समुद्रात फेकून देण्यात आली आहे. त्यात खाडीतून काढलेली ३२ ब्रास रेती आणि ५६ ब्रास दगडी भुसा अशा १०० गोण्या रेती पाण्यात टाकून देण्यात आली आहे.त्यात उदय पाटील, बाबू म्हात्रे, रमन्ना शेट्टी, मायकल घोंसालवीस, गौरव उपाध्याय, रवी सॅन्डस, कपाडिया कंपाउंड, मायकल मच्याडो अशा आठ जणांचा एकूण ८८ ब्रास रेती व दगडी भुसा नष्ट करत कारवाई करण्यात आली आहे.साठ्याचा पंचनामा करत जेसीबी मशीनच्या साहाय्याने खाडी पात्रात ढकलून देऊन वाळूसाठा नष्ट करण्यात आला आहे. तसा अहवाल अपर तहसीलदार कार्यालय मीरा- भाईंदर पाठवण्यात आला आहे. या अवैध तस्करीची तक्रार समाजसेवक वसंत माने, संजय मकवाना व गणेश दिघे यांनी केली होती.

तक्रारीनंतर घोडबंदर खाडी पात्रात अवैध रेती (वाळू) उत्खनन आणि वाहतूक सुरू असून त्यावर कारवाई करण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी आणि अपर तहसीलदार यांनी तलाठी , मंडळ अधिकारी यांना दिल्या होत्या. त्यानुसार मंडळ अधिकारी दिपक आहिरे आणि तलाठी अभिजित बोडके यांनी घोडबंदर येथील रेती बंदरात २४ ऑगस्ट रोजी छापा टाकला. यांना अंदाजे ८८ ब्रास रेती व दगडी भुसा साठा सापडला. समुद्रातील आणि खाडीतील मार्गाने अवैध बेसुमार रेती उपसा करून पर्यावरणाचा ह्रास पोहोचवण्याचे काम रेती माफियांना चालवले आहे. त्यामुळे एकीकडे शासनाचे कोट्यवधीचे महसूल बुडवून रेती माफियांनी आपला गोरख धंदा चालविला आहे. तर दुसरीकडे शासनाने वेळोवेळी चोरून रेती विकणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी ठोस पावले उचलली असली तरीही प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नाही.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -